• Sat. Jun 6th, 2026

    Maharashtra Weather : पुढील 24 तासात राज्याच्या हवामानात मोठा उलटफेर; मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार, 43 अंश तापमानात विजा कडकडणार, ‘या’ जिल्ह्यांत पाऊस बरसणार

    Maharashtra Weather : पुढील 24 तासात राज्याच्या हवामानात मोठा उलटफेर; मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार, 43 अंश तापमानात विजा कडकडणार, ‘या’ जिल्ह्यांत पाऊस बरसणार

    Maharashtra Weather Latest Update : राज्यात हवामानाचा दुहेरी फटका पाहायला मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर दुसरीकडे 43अंश तापमानामुळे उन्हाचा तडाखा कायम आहे.

    विदर्भाला यलो अलर्ट, हवामान विभागाचा नवा अंदाज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा नाट्यमय बदल पाहायला मिळत असून एका बाजूला कडक उन्हाचा तडाखा कायम असताना दुसरीकडे काही भागात पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने २९ एप्रिल रोजी विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उष्णतेत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी विजांच्या कडकडाटामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार

    मराठवाड्यात सध्या कोणताही अधिकृत अलर्ट नसला तरी नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र या विभागात उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून कमाल तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. उष्ण व दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक होणाऱ्या या बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, काढणीला आलेल्या पिकांना झाकून ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

    उकाडा कुठे कुठे?

    पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून तापमान ३९ ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोकण विभागातही पावसाची शक्यता कमी असली तरी दमट वातावरणामुळे उकाडा जाणवणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे.

    Maharashtra TimesSanjay Kakade: मुलाला आमदारकीसाठी राष्ट्रवादीकडून ऑफर? पक्षांतर करणार का? भाजपच्या संजय काकडेंनी मांडली रोखठोक भूमिका

    अनावश्यक बाहेर पडणे टाळावे

    हवामानातील या दुहेरी खेळामुळे व्हायरल आजारांचा धोकाही बळावला असून, लहान मुले आणि ज्येष्ठांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे तसेच मेघगर्जनेच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे सांगण्यात आले आहे. राज्यात सध्या उष्णतेची लाट आणि अचानक पडणाऱ्या पावसामुळे दुहेरी हवामानस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा