विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अभूतपूर्व घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार असतील तर इतर मित्रपक्षांचा आक्षेप नव्हता. पण त्यांच्याऐवजी त्यांच्या पक्षातील इतर कुणाला उमेदवारी दिली तर आक्षेप असेल, असं चित्र याआधीच बघायला मिळालं होतं. काँग्रेस विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी जास्त आग्रही असल्याचं याआधीच बघायला मिळालं आहे. ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे काँग्रेस दुखावली आहे. काँग्रेसकडून देखील उमेदवाराची घोषणा केली जाणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.