MHADA Mumbai Lottery Update : म्हाडा मुंबई लॉटरी २०२६ साठी अर्ज करणाऱ्या इच्छुकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. २,६४० घरांच्या सोडतीसाठी आता मोठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नवी डेडलाआईन जाणून घ्या…
मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी मुदत वाढली आहे.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई:मुंबई या मोठ्या शहरामध्ये स्वतःचं हक्काचं घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. असे स्वप्नं पाहणाऱ्या प्रत्येक इच्छुकांसाठी आता एक मोठी खुशखबर समोर आली आहे. मुंबई म्हाडाच्या मंडळाने आता 2640 घरांच्या गृहनिर्माण सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आल्याची माहिती दिली आहे. ज्या नागरिकांना आतापर्यंत यामध्ये अर्ज करता आले नव्हते त्यांच्यासाठी आता ही सुवर्णसंधी मानली जात आहे. म्हाडाने दिलेल्या नव्या मुदतीनुसार आता मुंबईतल्या घरांसाठी तुम्ही 14 मे 2026 पर्यंत अर्ज करु शकणार आहात.
मुदतवाढीचे कारण काय?
म्हाडाने मुदतवाढ देण्यामागचं कारण काय आता हा प्रश्न तुम्हालाही साहजिकच पडला असणार, तर म्हाडाच्या या योजनेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास आलेच होते, पण अनेक इच्छुकांनाही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे अर्ज भरता आले नव्हते. त्याचकारणांच्या पार्श्वभूमिवर मुदतवाढीचा हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आता मध्यमवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांनाना आता त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे. नागरिकांना या मुदतीमुळे त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त वेळही मिळणार आहे.
कुठे आहेत ही घरं?
दरम्यान, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे मुंबई म्हाडाने लॉटरी काढलेली ही घरं आहेत तरी कुठे, तर ही घरे विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर आणि पहाडी गोरेगाव अशा महत्त्वाच्या भागांमध्ये आहेत. त्यामुळे चांगल्या मोक्याचा ठिकाणी घरांचे पर्याय उपलब्ध झाल्याने आता या संधीचा फायदा घेण्यासाठी आता 15 दिवसांचा अधिकचा वेळ मिळाला आहे.
नव्या वेळापत्रकावर एक नजर
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2026
अनामत रक्कम भरण्याची मुदत: 15 मे 2026 (बँकेच्या वेळेत)
अर्जांची तात्पुरती यादी: 22 मे 2026 रोजी प्रसिद्ध होईल.
हरकती व दावे: 25 मे पर्यंत वेळ असेल.
अंतिम पात्र यादी: 29 मे 2026 रोजी जाहीर होईल.
लॉटरीचा निकाल (सोडत): 5 जून 202
फक्त एवढच नाही तर आता म्हाडाने स्पष्ट केले आहे की, घरांचा ताबा देण्यापूर्वी सर्व आवश्यक दुरुस्ती आणि रंगरंगोटीची कामे पूर्ण केली जातील. त्यामुळे अर्जदारांना ताबा मिळाल्यानंतर नूतनीकरणासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा