Shivsena Eknath Shinde News: बच्चू कडू यांनी आज शिवसेना प्रवेशासंदर्भात थेट घोषणा केली नसली तरी तसे स्पष्ट संकेत दिले असून ते शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार असतील, हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
बच्चू कडूंनी सस्पेन्स संपवला! विलीनीकरण झालं तरी हरकत नाही, एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषद घेत आज आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना प्रवेश आणि विधानपरिषद उमेदवारी याबाबत अधिकृत घोषणा करणं कडू यांनी टाळलं असलं तरी या प्रवेशाचे स्पष्ट संकेत त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून दिले आहेत. “एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याशिवाय विलीनीकरण शक्य नाही. मात्र शिवसेना ही आपल्या मातीतील संघटना आहे. भविष्यात प्रहारचं विलीनीकरण झालं तरी हरकत नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
विधानपरिषद उमेदवारी आणि शिवसेनेतील प्रवेशाबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “विधानपरिषद उमेदवारीबद्दल मलाही मीडियातूनच माहिती कळाली आणि कदाचित एकनाथ शिंदे यांनाही तुमच्याकडूनच याबाबत माहिती मिळाली असेल. माझी याबाबत उदय सामंत यांच्यासोबत काही वेळा चर्चा झाली आहे, मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत अद्याप बैठक झालेली नाही. आता मीडियातून ही चर्चा सुरू झाल्यानंतर आम्ही आमचे शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे आणि दिव्यांग बांधवांचे काही प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडू. त्या प्रश्नांवर जर एकनाथ शिंदे सकारात्मक असतील तर विधानपरिषदेचा आम्ही विचार करू. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी भेटायला बोलावलं तर मी त्यांची भेट घेईन,” अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
बच्चू कडू यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:
– आमच्या लढ्यामुळे देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण झालं – नागपूर इथं केलेल्या आंदोलनानंतर सरकारकडून शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात आली, यामध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरली – शिवसेनेतील बंडानंतर प्रहार संघटनेचा जन्म झाला – प्रहार संघटना जाती-पाती-धर्मातून नव्हे तर प्रचंड कष्टातून आम्ही ही संघटना निर्माण केली – प्रहारसोबत राज्यभरातील लाखो दिव्यांग बांधव आणि शेतकरी-शेतमजूर जोडले गेले आहेत -शिवसेनेसोबत गेल्यास शिवसेनेच्या वाढीसाठी प्रयत्न करू – आताच सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या तर तुम्ही आम्हाला राजनेता म्हणणार नाही
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा