Buldhana Bride Death: सुखी संसाराचं स्वप्न बघितलं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. प्री- वेडिंग शूटदरम्यान आजारी पडलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. काय घडलं नेमकं?
नेमकं काय घडलं?
मेहकर तालुक्यातील डोणगावपासून जवळच असलेल्या एका गावातील तरुण आणि वाशीम जिल्ह्यातील एका गावामधील तरुणीचे लग्न जुळले. ३ मेच्या मुहूर्तावर लग्न ठरले. लग्नासाठी सोन्या-चांदीचे दागिने, कपडे खरेदीला जाण्यासाठी उपवर मुलाने नवीन चारचाकी गाडी खरेदी केली. मोठ्या थाटामाटात लग्नाची खरेदी केल्या गेली. तर दुसरीकडे विवाह सोहळा अविस्मरणीय व्हावा, यासाठी प्री-वेडिंग शूट करण्याचे ठरले. नवऱ्या मुलाचा कृषी केंद्राचा व्यवसाय असल्याने प्री-वेडिंगसुद्धा कृषीशी निगडितच असावे, याचे नियोजन करण्यात आले.
Shivaji Kon Hota Book Controversy: पानसरेंवर मरणोत्तर फौजदारी कारवाई करा! आमदार संजय गायकवाड यांची मागणी
१६ एप्रिलला झालेलं शूट
भावी वधू-वराने शेतकरी म्हणून प्री-वेडिंग शूट करायचे ठरवले. डोणगावपासूनच जवळच असलेल्या एका निसर्गरम्य व जंगल परिसरात १६ एप्रिलला शूट झाले. त्याच दिवशी घरी परतल्यानंतर मुलगी आजारी पडली. सुरुवातीला गावातच उपचार करण्यात आले. नंतर शिरपूर, वाशीम, अकोला येथे औषधोपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. २३ एप्रिल रोजी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.
मृत्यू नक्की कशामुळे?
अलीकडे तापमानात वाढ झाली आहे. एसी गाडीमधील गारवा व पुन्हा प्री-वेंडिंग शूटसाठी तप्त उन्हात बाहेर निघणे, यामुळे उन्हाचा फटका बसून ती दगावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Marine Drive Accident: बर्थडे सेलिब्रेशन अखेरचं ठरलं! मुलगा रात्रभर बेपत्ता, आईबापाच्या जीवाला घोर, मरीन ड्राईव्ह अपघातात 19 वर्षीय कृष्णाचा मृत्यू
तर दुसऱ्या एका घटनेत, खेळता खेळता घरासमोरील खड्ड्यातील पाण्यात बुडून तीनवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी कोंढाळीतील शिक्षक कॉलनी परिसरात घडली. लाभांश कुलदीप चंदनखेडे असे मृताचे नाव आहे. त्याचे वडील कुलदीप हे खासगी काम करतात. त्यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत गेल्या तीन महिन्यांपासून खड्डा खणण्यात आला असून त्यात पाणी साचले आहे. रविवारी सायंकाळी खेळता खेळता लाभांश खड्ड्यात पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, लाभांश घरी न परतल्याने नातेवाइकांनी त्याचा शोध सुरू केला. तो खड्ड्यात बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून लाभांशला मृत घोषित केले.
