• Sat. Jun 6th, 2026

    Kolhapur Crime: कॉलेज तरुणींशी मैत्री, नंतर लॉजवर नेऊन 10 जणींचे व्हिडिओ काढले; कोल्हापुरातील फार्मसीच्या तरुणाचे बिंग कसे फुटले?

    Kolhapur Crime: कॉलेज तरुणींशी मैत्री, नंतर लॉजवर नेऊन 10 जणींचे व्हिडिओ काढले; कोल्हापुरातील फार्मसीच्या तरुणाचे बिंग कसे फुटले?

    Kolhapur News: अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पीडित इतर तरुणींनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन केले असून त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

    कॉलेज तरुणींशी मैत्री, नंतर लॉजवर नेऊन 10 जणींचे व्हिडिओ काढले; कोल्हापुरातील फार्मसीच्या तरुणाचे बिंग कसे फुटले?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कोल्हापूर: अमरावती आणि नाशिकमधील व्हिडीओ व्हायरल प्रकरणांचा तपास सुरू असतानाच, आता कोल्हापूर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील शाहिद समीर सनदे (वय 22) या तरुणाने अनेक निष्पाप तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, यामागे एखादी संघटित टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

    प्रेमाचे जाळे आणि अश्लीलतेचा खेळ
    पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहिद सनदे हा फार्मसीचे शिक्षण घेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने 18 ते 22 वयोगटातील तरुणींशी मैत्री केली आणि त्यांना प्रेमाच्या किंवा भावनिक जाळ्यात ओढले. त्यानंतर, कोल्हापूर आणि शिरोली येथील लॉजवर नेऊन त्याने तरुणींवर अत्याचार केले आणि त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रित केले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो तरुणींचे मानसिक आणि शारीरिक शोषण करत होता. पीडित तरुणीने हिंमत दाखवून राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने हा नराधमाचा काळा चेहरा समाजासमोर आला.

    फरार साथीदाराचा शोध; पोलिसांकडून सखोल तपास
    या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहिद सनदे याला हातकणंगले पोलिसांनी अटक केली असून, पेठवडगाव न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, शाहिदने पीडित तरुणीचे व्हिडीओ आपल्या एका मित्रालाही शेअर केले होते. हा साथीदार सध्या फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, शाहिदच्या ताब्यात 8 ते 10 तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडीओ असण्याची शक्यता आहे, त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत.

    जनतेचा रोष; शिरोली गाव बंदची हाक
    या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी शिरोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय सकल हिंदू समाजासह विविध संघटनांनी घेतला होता. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल आणि मुस्लिम समाजाच्या वतीनेही या घटनेचा निषेध नोंदवत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याला निवेदने देत, स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून, अशा विकृत मानसिकतेच्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा