Mumbai Watermelon Deaths : “शिळे कलिंगड जीवघेणे ठरण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कदाचित त्यात काही भेसळयुक्त पदार्थ असतील किंवा यामागे पूर्णपणे वेगळेच काही कारण असू शकेल. सध्याच्या टप्प्यावर, आम्ही कोणत्याही शक्यतेचा इन्कार करत नाही.” असं जेजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे म्हणाले
भेंडी बाजारातील चौकोनी कुटुंब
भेंडी बाजारातील मुघल बिल्डिंगमध्ये अब्दुल्ला डोकाडिया (वय ४०) हे पत्नी नसरीन (वय ३५), मुली आयशा (वय १६) आणि झैनब (वय १३) यांच्यासह वास्तव्यास होते. अब्दुल्ला अंधेरीमध्ये मोबाईल फोन ॲक्सेसरीजचे दुकान चालवत होते. त्यांच्या दोन्ही मुली आपल्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होत्या; आयेशा दहावीची परीक्षा अत्यंत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होईल अशी कुटुंबाला अपेक्षा होती, तर झैनब नववीच्या वर्गात जाण्यासाठी सज्ज होती, असे पोलिसांनी सांगितले.
रात्री शिल्लक राहिलेलं कलिंगड संपवलं
त्यांचे इतर चार भाऊ मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. शनिवारी त्यांनी सर्व भावांना घरी जेवायला बोलावले होते. चौघांपैकी दोन भाऊ आणि त्यांची तीन मुले असे पाच जण जेवायला आले. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास सर्वांनी बिर्याणी, तसेच इतर अन्नपदार्थ एकत्र खाल्ले. भाऊ आणि त्यांची मुले रात्री घरी परतल्यानंतर अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घरामध्ये शिल्लक असलेले अर्धे कलिंगड खाल्ले आणि झोपी गेले. पहाटेच्या सुमारास सर्वांना पोटदुखी आणि उलट्या सुरू झाल्या. त्यांनी परिचयातील डॉक्टरला घरी बोलावले. या डॉक्टरने उलट्या थांबण्याचे औषध दिल्यानंतर काही वेळ प्रकृतीत सुधारणा झाली; मात्र पुन्हा बिघडली.
Nashik News : लेकाचा गंभीर अपघात, ‘ब्रेन डेड’ घोषित; ‘माझा मुलगा दुसऱ्याच्या रुपात जिवंत राहील’, आदिवासी कुटुंबाचा अवयवदानाचा निर्णय
सकाळी मजल्यावर हलकल्लोळ
हे कुटुंब ‘घाटी गल्ली’ येथील ‘मुघल बिल्डिंग’च्या दुसऱ्या मजल्यावर राहत होते. रविवारी सकाळी ९.३० ते १० या वेळेत त्यांच्या मजल्यावर एकच गोंधळ उडाला; यामुळे शेजाऱ्यांनी चौथ्या मजल्यावर राहणारे होमिओपॅथिक डॉक्टर झैद कुरेशी यांना मदतीसाठी बोलावले. त्यांनी तपासणीअंती सांगितलं की, झैनबच्या तोंडातून फेस येत होता आणि तिची नाडी सापडत नव्हती, तर कुटुंबातील इतर तीन सदस्य अर्धवट शुद्धीवर होते.
प्रकृती अधिकच खालावत असल्याचे पाहून अब्दुल्ला यांनी भावांना कळविले. डॉक्टरने त्यांना जे. जे. रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अब्दुल्ला, नसरीन, आयशा आणि झैनब यांना रुग्णालयात नेण्यात आले.
Sanjay Shirsat | बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलिन करणार? शिरसाट काय म्हणाले?
झैनबचा आधीच मृत्यू, इतर तिघं रुग्णालयात
एकामागून एक, शेजाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात नेले. सर्वांना सर्वप्रथम मोहम्मद अली रोडजवळील ‘साबू सिद्दीकी रुग्णालयात’ नेण्यात आले, तिथे झैनबला दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. अब्दुल्ला आणि नसरीन यांना जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले; त्यानंतर आयेशालाही तिथेच हलवण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे म्हणाले, “शिळे कलिंगड इतके जीवघेणे ठरु शकेल, याची शक्यता अत्यंत कमी आहे. कदाचित त्यात काही भेसळयुक्त पदार्थ असतील किंवा मग यामागे पूर्णपणे वेगळेच काही कारण असू शकेल. सध्याच्या टप्प्यावर, आम्ही कोणत्याही शक्यतेचा इन्कार करत नाही आहोत.”
Nagpur News : मोकाट कुत्रे भुंकताच मंगलताई घाबरल्या, जीव वाचवण्यासाठी पळाल्या, पण भरधाव कारच्या धडकेत मृत्यूने गाठलं
त्यानंतर पाठोपाठ नसरीन, आयशा आणि रविवारी रात्री उपचारांदरम्यान अब्दुल्ला यांचा मृत्यू झाला. अब्दुल्ला यांचा मृत्यूपूर्वी जबाब नोंदविण्यात आला असून, त्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार नोंद घेण्यात आल्याचे जे. जे. मार्ग पोलिसांनी सांगितले.
फळातून विषबाधा ‘अत्यंत अशक्य’
घरी बनवण्यात आलेली बिर्याणी खाल्ल्यानंतर मध्यरात्री अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कलिंगड खाल्याने सर्वांची प्रकृती बिघडली. बिर्याणी तर इतर पाच जणांनीही खाल्ली होती, मात्र त्यांना कोणताच त्रास जाणवला नाही. फळातून इतके मृत्यू ओढवण्यापर्यंत विषबाधा होण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे यामध्ये कुटुंबाची आत्मघात, घातपात असे काही आहे का, याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
मूत्रपिंडांवरही गंभीर परिणाम
शिळ्या कलिंगडामुळे इतक्या कमी अंतराने चौघा जणांचा मृत्यू होणे ‘अत्यंत अशक्य’ आहे. चौघांना वाचवण्याचे सर्व वैद्यकीय प्रयत्न अयशस्वी ठरणंही अशक्यप्राय आहे, असं म्हणत डॉक्टरही गोंधळात पडले आहेत. जे.जे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरने सांगितले की, त्या तिघांमध्ये फूड पॉयझनिंगची लक्षणं दिसत होती. त्यांच्या मूत्रपिंडांवरही गंभीर परिणाम झाला होता.
Mumbai News : ICU बेड नसल्याने स्ट्रेचरवर ठेवलं, उपचारावेळी खाली पडल्याने लेकीचा मृत्यू, कूपर हॉस्पिटलवर कुटुंबाचे आरोप
कलिंगड सुरक्षित फळ
डॉक्टरांनी कलिंगडाला एक सुरक्षित फळ म्हटलं आहे. उन्हाळ्यातील एक अत्यंत लोकप्रिय फळ म्हणून याची गणना होते. कारण हे शरीराला आर्द्रता (पाणी) पुरवणारे फळ मानले जाते आणि यात ९० टक्क्यांहून अधिक पाण्याचा अंश असतो. परळ येथील ‘केईएम’ रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आकाश शुक्ला यांनी ठामपणे सांगितले की, कलिंगड हे शिळे झाले असले, तरीही त्यामुळे कोणाचा मृत्यू होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. वैद्यकीय इतिहासात “कडू चवीच्या काकड्यांमुळे” मृत्यू झाल्याच्या काही दुर्मिळ घटना घडल्या असल्या, तरीही कलिंगडाच्या बाबतीत घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
