• Sun. Jun 7th, 2026

    Mumbai Water Cut : मुंबईकरांना ‘El Nino’चा मोठा फटका; 1 मे पासून पाणी कपातीच्या निर्णयाची शक्यता, BMC चा प्लॅन काय?

    Mumbai Water Cut : मुंबईकरांना ‘El Nino’चा मोठा फटका; 1 मे पासून पाणी कपातीच्या निर्णयाची शक्यता, BMC चा प्लॅन काय?

    मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्याने १ मे पासून मुंबईत ५ ते १५ टक्के पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे. तलावांतील पाणीसाठा किती शिल्लक?

    मुंबई पाणी कपात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : कडाक्याचं ऊन आणि घामाच्या धारांनी आधीच हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आता चिंतेची बातमी आहे. मुंबईवर आता पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज वर्तवला असून, याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका ( BMC ) लवकरच शहरात पाणी कपात लागू करण्याच्या विचारात आहे. येत्या १ मे पासून ही कपात लागू होण्याची शक्यता आहे.

    पाणीसाठा घटतोय

    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठा सध्या वेगाने कमी होत आहे. तलावांमधील पाणी ऑगस्ट अखेरपर्यंत पुरवण्यासाठी महापालिकेने आतापासूनच नियोजित पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. जर सध्याच्या पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू ठेवला, तर हा साठा केवळ जुलै अखेरपर्यंतच टिकू शकेल, अशी भीती पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

    तलावांची स्थिती

    मुंबईला तुळशी, विहार, भातसा, तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या सात तलावांतून दररोज पाणीपुरवठा होतो. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता चिंतेत भर पडली आहे, कारण की केवळ २८.७९% पाणी शिल्लक आहे.

    Maharashtra TimesJalna Accident : लेकीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच वडिलांसह एकुलता एक लेक दगावला; भरधाव दुचाकी धडकल्याने तिघांचा मृत्यू, जालना हळहळलं

    दैनंदिन तूट

    मुंबईला रोज ४,३०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात ३,८५० दशलक्ष लिटरच पुरवठा होतो.

    ‘एल निनो’चा फटका आणि वाढती उष्णता

    ‘एल निनो’ या हवामान बदलामुळे यंदा जून आणि जुलै महिन्यात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यातच मुंबईत मार्च आणि एप्रिलमध्ये उष्णता वाढल्यामुळे तलावांमधील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. पावसाळा लांबणीवर पडल्यास शहरात ‘पाणीटंचाई’ निर्माण होऊ नये, यासाठी हा कपातीचा निर्णय घेतला जात आहे.

    किती असेल कपात?

    मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ५% ते १५% दरम्यान पाणी कपात केली जाऊ शकते. १ मे पासून याची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता असून, पालिका प्रशासन याच आठवड्यात याबाबतची अधिकृत घोषणा करणार अशीही माहित समोर येते आहे. त्यामुळे, जोपर्यंत वरुण राजा बरसत नाही, तोपर्यंत मुंबईकरांनी पाण्याचा थेंब अन् थेंब जपून वापरण्याची गरज अधोरेखीत झाली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा