• Sat. Jun 6th, 2026

    Pune MHADA Lottery: आता ‘पुणे-मुंबई एक्सप्रेस वे’जवळ मिळणार स्वत:चं घर! ताथवडे परिसरात म्हाडाची 792 घरांची लॉटरी; नोंदणीला सुरुवात

    Pune MHADA Lottery: आता ‘पुणे-मुंबई एक्सप्रेस वे’जवळ मिळणार स्वत:चं घर! ताथवडे परिसरात म्हाडाची 792 घरांची लॉटरी; नोंदणीला सुरुवात

    Tathawade MHADA Lottery: पुण्यात ताथवडे परिसरात म्हाडाने दुसऱ्या टप्प्यासाठी सोडत जाहीर केली आहे. यामध्ये 792 घरांपैकी 24 घरं अल्प उत्पन्न गटासाठी तर इतर 768 घरं मध्यम उत्पन्न गटासाठी राखीव असतील.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड जवळील ताथवडे येथील घरांसाठी 8 जुलै 2026 रोजी सोडत काढली जाणार आहे. त्यासाठी सोमवार, 27 एप्रिलपासून अर्जविक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या ठिकाणी म्हाडाच्या पुणे महामंडळाने 792 घरांच्या सोडतीची माहिती रविवारी प्रसिद्ध केली. त्यात ताथवडे हे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या अगदी जवळ आहे. यामुळे पुण्यात स्वतःचं घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना स्वप्नपूर्तीची मोठी संधी मिळणार आहे.

    सोडतीचा अंतिम टप्पा

    म्हाडा पुणे मंडाळाने काही वर्षांपूर्वीच ताथवडे येथे गृहप्रकल्प उभारायला सुरुवात केली. या जमिनीवर दोन टप्प्यात घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यातील 600हून अधिक घरांची विक्री यापूर्वीच पूर्ण झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील विक्रीसाठी 792 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. या घरांचे काम येत्या चार महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये सोडत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा या सोडतीचा अंतिम टप्पा असल्यामुळे नागरिकांसाठी ही शेवटची संधी आहे.या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी 24 सदनिका असून त्यांची किंमत 46 ते 47 लाख रुपये असेल. या घरांचे क्षेत्रफळ 59.08 चौ.मीटर ते 60.66 चौ. मीटर असेल. 792 घरांपैकी केवळ 24 घरे अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) राखीव ठेवले आहेत. इतर 768 घरं, मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) राखीव ठेवले आहेत. मध्यम गटातील घरांचे क्षेत्रफळ 69.34 ते 70.92 चौ.मीचर असून त्यांची किंमत 64 लाक 50 हजार रुपये ते 65 लाख 50 हजार रुपयांच्या दरम्यान असेल.

    अर्ज नोंदणी कधीपासून?

    या सोडतीसाठी सोमवारी, 27 एप्रिल रोजी, दुपारी दीड वाजल्यापासून नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करून अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर 2 जूनपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची मुदत म्हाडाने दिली आहे. सोडतीत सहभागी होण्याकरिता ही अनामत रक्कम भरणे अनिवार्य आहे. अल्प गटासाठी अनामत रक्क 50 हजार रुपये आहे. दरम्यान, मध्यम गटासाठी अमानत रक्कम 75 हजार रुपये असेल. या व्यतिरिक्त नागरिकांना अर्ज भरताना विनापरतावा 708 रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल. 30 जून रोजी पात्र अर्जांची यादी जाहीर करून नंतर 8 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सोडत जाहीर होईल. 8 जुलैला हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

    ताथवडे सारख्या महामार्गांलगत असलेल्या ठिकाणी पुणेकरांना घर विकत घेणं शक्य होणार आहे. पुणे मुख्य शहर आणि दोन महामार्गांना जोडणारे हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

    पुण्यातील कोणत्या भागांमध्ये म्हाडाची सोडत सुरू?

    म्हाडाच्या पुणे मंडळाद्वारे 2025-26 या वर्षात विविध गृहनिर्माण योजनांर्तगनत प्रमुख भागात घरे उपलब्ध आहेत. ताथवडेशिवाय वाकड, चिखली, लोहगाव, मुंढवा, येवलेवाडी, वाघोली, किवळे, फुरसुंगी, डुडुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर आणि पुनावळे या भागांचा समावेश आहे.

    पुण्यात म्हाडा फ्लॅट कसा खरेदी करावा?

    पुण्यात म्हाडाचा (MHADA) फ्लॅट खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचा वापर केला जातो. पुण्यात म्हाडा फ्लॅट खरेदी करण्याची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया:
    1. म्हाडाच्या अधिकृत लॉटरी वेबसाईटवर mhada.gov.in ला भेट द्या. ‘New Registration’ वर क्लिक करून युजरनेम आणि पासवर्ड तयार करा.

    2. नोंदणीकृत आयडी वापरून लॉग इन करा. ‘Pune Board Lottery 2025’ किंवा नवीन सुरू असलेली योजना निवडा. तुमच्या उत्पन्न गटावर (EWS, LIG, MIG, HIG) आधारित योजना निवडा.

    3. म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला अनामत रक्कम (Earnest Money Deposit – EMD) जमा करावी लागते, जी उत्पन्नाच्या गटावर अवलंबून असते

    4. कागदपत्रे अपलोड करा

    5. अंतिम टप्प्यात सोडत निघते. जर या यादीत तुमचे नाव असेल तर पुढील प्रक्रिया सुरू होतेय

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा