• Sun. Jun 14th, 2026
    अकोला देशात सर्वात उष्ण शहर, पारा 46.9 अंशांवर; थंड हवेची ठिकाणंही गरमागरम, महाबळेश्वर-माथेरान 33 पार

    Maharashtra Weather Update : रविवारी देशातील १६ सर्वात उष्ण शहरांपैकी सहा शहरं महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील असून विदर्भाबाहेरील पुणे, सोलापूर आणि नाशिकमध्येही पारा ४० अंशांच्या पार गेला होता.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : रविवारचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत उकाड्याचा ठरला. कारण राज्यातील अनेक शहरांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागानुसार ४६.९ अंश सेल्सिअस तापमानासह अकोला हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. त्यापाठोपाठ अमरावती (४६.८), वर्धा (४६.४), यवतमाळ (४६) आणि नागपूर (४५.४) यांचा क्रमांक लागला. ऐन उन्हाळ्यात, मे महिन्याच्या सुट्टीत माथेरान-महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन ‘चिल’ होण्याचा विचार करत असाल, तर थांबा. कारण या ठिकाणचं कमाल तापमानही ३३ अंशांच्या पार गेलेलं आहे.

    रविवारी देशातील १६ सर्वात उष्ण शहरांपैकी सहा शहरं महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील होती. अकोला ४६.९ अंश सेल्सिअससह सर्वात उष्ण होतं; तर विदर्भाबाहेरील पुणे, सोलापूर आणि नाशिकमध्ये पारा ४० अंशांच्या पार गेला होता.

    पश्चिम महाराष्ट्रात तापमान किती?

    सोलापूरमध्ये कमाल तापमान ४३ अंश, त किमान तापमान २६.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ४१.४ अंश कमाल तापमान नोंदवले गेले, तर कोल्हापूरमध्ये त्यामानाने कमी, म्हणजेच ३७.६ अंश कमाल आणि २५.३ अंश किमान तापमान नोंदवले गेले.

    पुण्यात तापमान ४१.८ अंशांच्या वर गेले. नाशिकमध्ये ४१.५, बीडमध्ये ४१.९ आणि अहिल्यानगरमध्ये ४१.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
    Maharashtra TimesCrime News : मला तुझ्याशी शरीरसंबंध ठेवायचेत, नांदेडच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मित्राकडे अनैसर्गिक संबंधांचा तगादा, 24 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल

    थंड हवेच्या ठिकाणीही वातावरण गरम

    विशेष महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणं म्हणून ओळखली जाणारी पर्यटन स्थळंही उष्म्यापासून सुटली नाहीत. हिल्स स्टेशनपैकी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे किमान तापमानात ३.९° अंशांची वाढ होऊन ते २३.४ वर पोहोचले. पुणे जवळील लोहगावचा अपवाद वगळता, राज्यातील तापमानातील ही सर्वात मोठी वाढ ठरली. लोहगावमध्ये रात्रीचे तापमान ५.३ अंश सेल्सिअसने वाढले होते. महाबळेश्वरचे कमाल तापमान ३३.७ अंश नोंदवले गेले. तर माथेरानमध्ये रविवारी कमाल तापमान ३७.२ अंश नोंदवण्यात आले.

    Auto-Taxi driver Marathi | मुंबईत अमराठी रिक्षाचालकांचा मराठीसाठी पुढाकार तर मनसेकडून स्टिकरचं वाटप

    उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग

    दरम्यान, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या उजनी धरणातून, सोलापूर जिल्हा कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार, सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी भीमा नदीमध्ये ६,००० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.
    Maharashtra TimesAtal Setu : माझ्या पतीच्या मृत्यूचा दाखला द्या… डोंबिवलीकर तरुणाने अटल सेतूवरुन आयुष्य संपवलं, पत्नीची पावणे दोन वर्षांपासून फरपट
    अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उन्हाळ्यात पाण्याचा विसर्ग नेहमीच्या दोन आवर्तनांऐवजी केवळ एकाच आवर्तनात केला जाईल. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्यासाठी विसर्ग करण्याची आवश्यकता उरलेली नाही; कारण सोलापूर शहराला आता धरणातून थेट एका समर्पित जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा