• Mon. Sep 7th, 2026
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहा लाइव्ह फक्त एका क्लिकवर


Marathi Live News: राज्यातील रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीसक्ती करण्याच्या मुद्दयावरून राजकीय रणकंदन सुरू आहे. या निर्णयाला अनेक रिक्षा-टॅक्सीचालक संघटनांनी विरोध सुरू केल्याने निर्णयाच्या अंमलबजावणीला दीड-दोन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांच्या प्रतिनिधींना उद्या, मंगळवारी बैठकीसाठी बोलावले असून, त्यांच्याशी चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली. दरम्यान, महामुंबई आणि कोकणात काही ठिकाणी विदर्भासारखे तापमान नोंदवले गेले. परिणामी उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed