• Sat. Jun 6th, 2026

    Mumbai Metro 6: पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणार मेट्रो! रेल्वे रुळ ओलांडून मेट्रो 6चा मार्ग; कोणत्या स्थानकांचा समावेश?

    Mumbai Metro 6: पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणार मेट्रो! रेल्वे रुळ ओलांडून मेट्रो 6चा मार्ग; कोणत्या स्थानकांचा समावेश?

    Mumbai Metro Pink Line: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडण्यासाठी अखेर मेट्रो उभारली जात आहे. काही काळापासून पिंक लाइनचं काम प्रलंबित होतं. आता पश्चिम रेल्वेच्या रुळांवर गर्डर उभारण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. नुक्तीच मेट्रो लाइन 9 आणि 2बी ची सुरूवात झाली. मेट्रो 9ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत असला तरी मेट्रो 2बी वर प्रवाशांची संख्या सध्या कमीच आहे. आता यानंतर मुंबईत मेट्रो लाइन 6ला च्या कामांना देखील वेग मिळाला आहे. या मेट्रोचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील काम प्रलंबित होतं. पण आता या कामालाही चालना मिळाली असून रविवारी, रेल्वे रुळांवर स्टील गर्डर उभारण्याचं काम पूर्ण झालं आहे.

    कुठून-कुठे जोडणार?

    मेट्रो लाइन 6 (पिंक लाइन) अंधेरीतील स्वामी समर्थ नगर आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळीपर्यंत धावणार आहे. रविवारी पश्चिम रेल्वेचे रुळ ओलांडून ही मार्गिका पुढे जाणार आहे. मुंबई मेट्रो 6 15.31 किमी लांब आहे. स्वामी समर्थ नगरपासून जोगेश्वरी, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पवईवरून विक्रोळीपर्यंत पोहोचेल. पिंक लाइन पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणार आहे. ही मार्गिका पूर्णपणे उन्नत असेल.Maharashtra TimesMumbai Local: लोकल ट्रेनचा विलंब आता विसरा! पाचव्या व सहाव्या मार्गिकेमुळे प्रवास सुस्साट; मध्य-पश्चिम रेल्वेवर विस्तार

    25 एप्रिल रोजी रात्री 10.15 ते 26 एप्रिल रोजी सकाळी 8.15 वाजेपर्यंत सुमारे 10 तास काम पूर्ण करण्यात आलं. इतर सर्व कामे आता पूर्ण झाल्यामुळे लाइन पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल. गर्डरचं काम करण्यासाठी जोगेश्वरी ते राम मंदिर स्थानकांदरम्यान 6 व्या मार्गावर आणि दहिसर येथे ब्लॉक हाती घेतले होते. ब्लॉक कालावधीत काही उपनगरी सेवा रद्द करण्यात आल्या होत्या.

    4 इंटरचेंजेस उपलब्ध

    मुंबई मेट्रो पिंक लाइन ही चार मेट्रो मार्गांसाठी इंटरचेंजेस असलेली एक महत्त्वपूर्ण लाइन आहे. या मार्गिकेवरून यलो लाइन-2 ए च्या बांगूर नगर स्थानक, रेड लाइन-7 च्या जेव्हीएलआर स्थानक, एक्वा लाइन-3 च्या आरे डेपो मेट्रो स्थानक आणि ग्रीन लाइन-4 च्या गांधी नगर स्थानकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी इंटरचेंजेस उपलब्ध असतील. या मार्गावर 13 स्थानके आहेत आणि बहुतेक मार्गिका जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या मध्यभागावरून जात आहे. अंधेरी येथे महाकाली नगरजवळील एका ठिकाणी, 2.5 किमी लांब लिंक रोडचा मार्ग पिंक लाइनशी थेट जोडण्यात आला आहे. महापालिकेच्या सहकार्याने अतिरिक्त वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रोड मेडियनवर एका पियरवर मेट्रो आणि लिंक रोडचा मार्ग आहे.

    Maharashtra TimesMumbai-Ahmedabad Bullet Train: ‘बुलेट ट्रेन’साठी रुळ बसवण्याचा कामाला वेग, पहिल्यांदाच जपानी प्रणालीचा वापर; मुंबईत भुयारी बुलेट स्थानाक

    कुठे असतील स्थानकं?

    या मेट्रो मार्गिकेवर एकूण 13 स्थानकं असतील. लोखंडवाला जवळील स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, जोगेश्वरी पश्चिम, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR), श्याम नगर, महाकाली केव्स, सीप्ज विलेज, साकी विहार रोड, रामबाग, पवई लेक, आयआयटी-पवई, कांजुर मार्ग पश्चिम आणि विक्रोळी (पूर्व द्रुतगती महामार्ग) या स्थानकांचा समावेश आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा