• Sat. Jun 20th, 2026

    पुणे शहराबाहेर मेट्रोचा विस्तार! उपनगरामध्ये 4 नव्या मार्गांचा प्रस्ताव; खेड-शिवापूर टोलनाक्यापर्यंत जोडणार

    पुणे शहराबाहेर मेट्रोचा विस्तार! उपनगरामध्ये 4 नव्या मार्गांचा प्रस्ताव; खेड-शिवापूर टोलनाक्यापर्यंत जोडणार

    Katraj-Khed Shivapur Metro: पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहराबाहेर मेट्रोचा विस्तार करण्याची मागणी केली जात आहे. आता चार नव्या मेट्रो मार्गिकांना मंजुरी मिळाली असून प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

    म.टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोचे जाळे उपनगर आणि बाह्य भागांपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. नगरसेवकांनी मांडलेल्या उपसूचनांद्वारे चार नवीन मेट्रो विस्तार प्रस्तावांना एकमताने मंजुरी देऊन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

    कुठे-कुठे असतील मार्ग?

    सध्या पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत केवळ दोन मार्ग कार्यरत असून, उर्वरित मार्ग विविध टप्प्यांवर प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यातील वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन मेट्रो नेटवर्क शहराच्या हद्दीबाहेर नेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सभागृहाने मंजूर केलेल्या प्रस्तावांनुसार कात्रज ते खेड शिवापूर टोलनाका, खडकवासला ते डोणजे, वाघोली ते लोणीकंद आणि कात्रज ते उंड्री असे चार नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. या विस्तारांमुळे मेट्रो सेवा शहराबाहेर 20 किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे.Maharashtra TimesPune Crime: पुण्यात 19 वर्षीय तरूणीने जीवन संपवलं, चार महिन्यांनंतर प्रकरणाला वेगळं वळण; ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे प्रियकरावर संशय

    नगरसेविका वर्षा तापकीर यांनी स्वारगेट-कात्रज मार्ग पुढे खेड शिवापूरपर्यंत नेण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा झडली; तसेच काकासाहेब चव्हाण आणि अनिता इंगळे यांनी खडकवासला-डोणजे विस्ताराची उपसूचना देऊन सिंहगड आणि पानशेत परिसरातील वाढत्या पर्यटनाचा मुद्दा उपस्थित केला. या वेळी कात्रज-उंड्री आणि वाघोली-लोणीकंद मार्गांवरही मेट्रोसाठी उपसूचना दिली. सभागृहाने सर्वच उपसूचनांना मंजुरी दिली असून, प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

    रिंग रोडलाही जोडणार

    कात्रज ते खेड-शिवापूरपर्यंत विस्तार केल्यावर या मेट्रो मार्गाला पुण्यातील प्रस्तावित रिंग रोडशीही जोडले जाणार आहे. हा पीएमआरडीए रिंग रोड शहराबाहेर तयार होणाऱ्या बाह्य रिंग रोडला सुद्धा जोडला गेला आहे. त्यामुळे बाह्य व अंतर्गत रिंग रोडसह पुणे मेट्रो अशी तिहेरी कनेकटीव्हीटी निर्माण होणार आहे. दक्षिण पुण्यातील वाढत्या शहरीकरणामुळे या विस्ताराचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

    Maharashtra Timesपुण्यात PMP Busमधून तिकीट काढणं झालं सोपं! आता कंडक्टरविनाच बुकिंग शक्य; स्वारगेट, चाकण, कात्रजमध्ये सेवा सुरू

    वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडीही वाढत आहे. नव्या चार मेट्रो मार्गिकांना सुरूवात होताच नागरिकांना प्रवासाचा एक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूर्वक पर्याय मिळणार आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक सुखद होईल. मेट्रो कॉरिडोर आणि रिंग रोडच्या प्रस्तावित कनेकटीव्हीटीमुळे शहरातील वाहतूक संतुलित होण्यास मदत होईल. यामुळे कात्रज, शिवापूर आणि रिंग रोड लगतच्या नव्याने विकसित होणाऱ्या परिसरांमधील रहिवाशांना मोठा फायदा होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासात हा प्रकल्प महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा