Mother And Kids Drown: सायंकाळी कपडे धुण्यासाठी सोलापूरातील एक महिला आपल्या लेकरांना घेऊन तलावाजवळ गेली असता त्या तिघांचा पाण्यात बुडून करूण अंत झाला.
Solapur | सोलापूर महापालिकेत पाणी योजनेवरून गोंधळ, शिंदे-काँग्रेसचे नगरसेवक निलंबित, भाजपची कारवाई
इरफान शेख, सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे काळीज पिळटवून टाकणारी घटना घडली आहे. पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावभर हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत आईसह दोन चिमुकल्या लेकरांचा मृत्यू झाला आहे. दोन मुलासह कपडे धुण्यासाठी तलावात गेलेल्या महिलेचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खडकी येथे घडली. वैशाली अनिल घोडके (वय 35 वर्षे),श्रेया अनिल घोडके(वय 12 वर्षे),सोहम अनिल घोडके(वय 10 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
पती मजुरी करून घरी आला अन् शोध घेण्यास सुरू केलं
वैशाली अनिल घोडके या दोन्ही चिमुकले घेऊन शुक्रवारी सांयकाळी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. वैशाली घोडकेसोबत श्रेया आणि सोहम हे दोन्ही लेकरं होती. कपडे धुण्यासाठी घरात शेजारी असलेल्या तलावाकडे शुक्रवारी सायंकाळी चार ते पाच च्या दरम्यान गेले होते, परंतु ते परत आले नाहीत. मजुरीचे काम करणारा पती बाग छाटणीचे काम करून घरी आल्यानंतर पाहिले असता पत्नी व दोन मुले दिसून आले नाहीत. पती अनिल घोडके याने आजूबाजूच्या शेजाऱ्याकडे विचारणा केली असता त्यांनी कपडे धुण्यास गेल्याचे सांगितले.Manohar Mama Bhosale : जामिनावर असूनही भोंदूगिरी सुरुच, महिलांवर अत्याचार, बाळूमामाच्या भक्तांची फसवणूक, अखेर ‘मनोहर मामा’ला पुन्हा अटक
वैशालीचा मृतदेह तरंगत वर आला
यानंतर अनिल यांच्या मनात भीती निर्माण झाली. इतका वेळ का लागत असेल याचं कारण शोधायला अनिल घोडके तलावाकडे गेले. तलावाच्या परिसरात शोध घेतले असता कपडे धुण्याचे साहित्य तलावाशेजारी आढळून आले. दोन्ही मुले आणि पत्नी दिसून आली नाही. रात्री दहाच्या दरम्यान वैशालीचा मृतदेह पाण्यात तरंगत वर आला.
Solapur | सोलापूर महापालिकेत पाणी योजनेवरून गोंधळ, शिंदे-काँग्रेसचे नगरसेवक निलंबित, भाजपची कारवाई
शनिवारी सकाळी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून रेस्क्यू टीमच्या पथकाने शोध घेतला असता त्या दोन मुलांचा मृतदेह शनिवारी सापडला. तीन मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला असून तिघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तिघांच्या अकाली निधनामुळे या परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा