Thane Ghodbunder Road: पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीच्या कामामुळे ठाणे पोलिसांनी ब्रह्मंद जंक्शनजवळील घोडबंदर रोडवर तात्पुरते वाहतूक बदल करण्याची घोषणा केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे: ठाण्यात घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दररोज सुरू असतानाच आता मे महिन्यांत यामध्ये भर पडणार आहे. महापालिकेने घोडबंदर मार्गावर एका पादचारी पुलाचं काम हाती घेतलं आहे. यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. परंतु, सध्या या पुलासाठी गर्डर उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामांसाठी मे महिन्यात दोन दिवस घोडबंदर रोडवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येणार आहे.
कधीपासून बंदी सुरू?
या पादचारी पूलाच्या (Foot Over Bridge) गर्डरसाठी 8 ते 10 मे दरम्यान रस्ता तात्पुरता बंद करण्यात येणार आहे. ठाणे शहर पोलिसांच्या अधिकृत घोषणेनुसार 8 ते 10 मे रोजी घोडबंदर मार्गावर दोन टप्प्यांत काम करण्यात येणार आहे. यादरम्यान वाहनांना इतर मार्गांवर वळवण्यात येणार आहे. 8 मे रोजी पहिल्या टप्प्यातील काम हाती घेण्यात येणार आहे. 8 मे रात्री 11.55पासून ते 9 मे रोजी 11.55 हे काम सुरू असेल. त्यामुळे या 24 तासांदरम्यान मार्गावर तात्पुरता प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 9 मे रोजी रात्री 11.55 पासून ते 10 मे रोजी पहाटे 6 वाजेपर्यंत मार्गावर काम सुरू असेल. या दोन्ही टप्प्यातील कामं पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग पुन्हा प्रवाशांसाठी खुला करण्यात येऊन वाहतूक सुरळीत होणार आहे. पण या कालावधी दरम्यान घोडबंदर मार्गावरील प्रवाशांना थोड्या अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे.
कुठे असणार प्रवेशबंदी?
घोडबंदर ठाण्यापासून ब्रम्हांड सिग्नल व्हाया मानपाडा-कापुरबावडीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल. तसेच, ठाणे घोडबंदर रोडवरील एमजी मोटर्स शोरूम मानपाडा वरून मानपाजा ब्रिजवर चढणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. या नियमांची दखल घेऊन या दोन दिवसांत प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन ठाणे शहर पोलिसांनी प्रवाशांना यावेळी केलं आहे.
Konkan Railway: मे महिन्यात कोकणवासियांना मिळणार खास भेट! आठवड्यातून तीन दिवस दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू सेवा; कसं असेल वेळापत्रक ?
पर्यायी मार्ग कोणते?
ब्रम्हांड सिग्नलकडून कापुरबावडीकडे जाणाऱ्या वाहनांना ब्रम्हांड सिग्नलपासून वळवून ब्रम्हांड सर्कल मार्गे वळवण्यात येईल. तिथून आझादनगर रोडने लोढा अमारा समोरील चौकातून कोलशेत-ढोकळी मार्गाने उजवीकडे वळुन कापुरबावडी मार्गे इच्छित स्थळी पोहोचू शकतील. दरम्यान, ठाणे घोडबंदर रोडने येणार्या वाहनांना मानपाडा ब्रिजच्या बाजुच्या स्लिप रोडने नागोरी टी स्टॉल येथून डावीकडे वळवळे जाणार आहे. तिथून टिकुजीनी वाडी सर्कलवरून उजवीकडेवळून निळकंठ ग्रीनसमोरील रोडने मुल्लाबाग कट येथून इच्छित स्थळी पोहोचता येईल.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा