नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त पुण्यात महाराष्ट्रातील इतर शहरांसह बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड नागरिक मोठ्या संख्येने राहतात. दिवाळीनिमित्त कुटुंबासह गावी जाण्यासाठी दानापूर, पाटणा, गोरखपूर, नागपूर, अमरावती तसेच उत्तर भारत आणि पूर्व भारताकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते. आता दिवाळीच्या काळात या शहरांकडे जाणाऱ्या गाड्या रिग्रेट दाखवत आहेत. आरक्षण खुले झाल्यानंतर काही मिनिटांतच उपलब्ध जागा संपत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वेने एक नोव्हेंबर २०२४ पासून आगाऊ आरक्षणाचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवस केला आहे.
Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! गणेशोत्सवात पहाटेपर्यंत धावणार मेट्रो, दर 5 मिनिटांनी फेऱ्या, कसे आहे नियोजन?बस, विमानाची दरवाढ
‘रिग्रेट’ म्हणजे संबंधित गाडी आणि श्रेणीतील सर्व आरक्षित जागा आणि प्रतीक्षा यादीची निर्धारित मर्यादाही पूर्ण झालेली असणे. त्यामुळे आरक्षण प्रणाली पुढील प्रतीक्षा तिकीट स्वीकारत नाही. परिणामी प्रवाशांना तत्काळ आरक्षण, खासगी बस किंवा विमानप्रवासाचा पर्याय निवडावा लागतो. सणासुदीच्या काळात खासगी बसचे भाडे वाढण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक फटका बसणार आहे. पुणे आणि हडपसरहून दानापूर, गोरखपूर, नागपूर, अमरावती, कोकणासाठी जादा गाड्या सोडाव्यात, अशी मागणी होत आहे. नियमित गाड्यांना जादा डबे जोडावेत, विशेष गाड्यांचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे आणि आरक्षणातील गैरप्रकार रोखावेत, अशाही मागण्या आहेत.
‘रिग्रेट’ म्हणजे काय?
एखाद्या गाडीतील आरक्षित जागा भरल्यानंतर प्रतीक्षा यादीची निर्धारित मर्यादाही पूर्ण झाल्यास पुढील तिकिटांसाठी आरक्षण करता येत नाही. अशा वेळी संबंधित गाडी आणि श्रेणीसमोर ‘रिग्रेट’ किंवा ‘नो रूम’ असा संदेश दिसतो.
Pune News: दारिद्र्याचे चटके, दीड वर्षांच्या चिमुकलीला आई-बापाने देहूतील डोंगराजवळ सोडलं, महिला पोलीसही भावनावशरिग्रेट’ दाखवणारे प्रमुख मार्ग
पुणे-नागपूर/अमरावती : महाराष्ट्र एक्सप्रेससह विदर्भाकडे जाणाऱ्या गाड्या
पुणे-गोवा/कोकण: गोवा, मंगळुरू आणि एर्नाकुलमकडे जाणाऱ्या गाड्या
उत्तर भारत मार्ग : दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक मागणी
पुणे-दानापूर/पाटणा: पुणे-दानापूर एक्सप्रेससह बिहारकडे जाणाऱ्या गाड्या
पुणे-गोरखपूर : उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या बहुतांश एक्सप्रेस
दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाण्यासाठी काही दिवस आधीपासून तिकीट काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पुण्याहून जाणाऱ्या बहुतांश गाड्यांचे आरक्षण सुरू होताच काही वेळातच जागा संपल्या. आता वेटिंग लिस्ट असल्याने कुटुंबासह प्रवास कसा करायचा, याची चिंता आहे. –अमोल पाटील, रेल्वे प्रवासी, पुणे
