Devendra Fadanvis Reaction Marathi Compulsion : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांना आता मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १ मे पासून हा नियम लागू होणार असून ४ मे ला संपाचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : गेले काही दिवस महाराष्ट्र ामध्ये मराठीचा मुद्द्यावरुन चर्चा रंगते आहे. आता राज्यात रिक्षा आमि टॅक्सी चालकांना जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांना मराठी भाषा बोलता यायला हवी असा स्वरुपाचा मुद्दा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणावरु सध्या राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळते आहे. येत्या १ मे पासून या निर्णयाची अमलबजावणी होणार आहे. त्यापार्श्वभूमिवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही या सर्व प्रकरणात एन्ट्री झाली आहे. मनसेने नेहमीच मराठीचा मुद्दा उचलून धरला होता त्यामुळे याप्रकणातही मनसे नेमकी काय भूमिक ठेवणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. त्याशिवाय आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी त्यांची पहिली भूमिका जाहिर केली आहे.
४ मे पासून संपावर
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेत बोलावं लागेल, मराठी बोलता, लिहिता आणि वाचता न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करणार असल्याचा इशारा प्रताप सरनाईकांनी दिला आहे. त्यामुळे मराठी भाषा सक्तीची या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात ४ मे पासून मुंबईतील 15 लाख रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यावरुन हे सर्व प्रकरण तापले आहे. दरम्यान, यावर बोलताना मनेसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तुमची ताकद आम्हाला ४ मेला दाखवा, भैया लोकांना आता महाराष्ट्र आणि मुंबईमधून बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे,” असं म्हणाले आहेत.
Manohar Mama Bhosale : जामिनावर असूनही भोंदूगिरी सुरुच, महिलांवर अत्याचार, बाळूमामाच्या भक्तांची फसवणूक, अखेर ‘मनोहर मामा’ला पुन्हा अटक
देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मराठी भाषा सक्तीची या सर्व प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली आहे. मुंबई, किंवा महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “पहिली गोष्ट म्हणजे मुंबई, महाराष्ट्रात मराठीचा आग्रह होणं, मराठीला प्राथमिकता द्या असं सांगणं चुकीचं नाही. पण यावरुन कोणताही वाद होऊ नये ही सरकार म्हणूण आमची भूमिका आहे, तर ज्यांना टॅक्सी, रिक्षा चालकांना मराठी येत नाही, त्यांना मराठी शिकवू” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
संजय निरुपम यांचं म्हणणं काय?
दरम्यान, काल संजय निरुपम यांनीही या मुद्यावरु त्यांची प्रतिक्रिया दिली होती. “रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून मराठी बोलण्याची अपेक्षा केली पाहिजे. त्यांनी मराठीतून संवाद साधला पाहिजे. पण त्यांची परिक्षा घेऊ नका, कारण ते जास्त शिकलेले नाहीत. जास्त शिकलेले लोक रिक्षा, टॅक्सी चालवतील का? कॉर्पोरेटमध्ये काम करणारे रिलायन्स, बिर्ला यांच्या कंपन्यांमध्ये काम करणारे सगळे लोक मराठीत बोलतात का?. झोमॅटो, स्विगीवरुन पार्सल घेऊन येणारे मराठीत बोलतात का?” असे प्रश्न संजय निरुपम यांनी माध्यमांशी बोलताना विचारले.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा