स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेला सोलापूर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. ५० हजार रुपयांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचारासह अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
भोंदूबाबा मनोहर भोसलेला अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इरफान शेख, सोलापूर: राज्यात भोंदूबाबांची जणू लाटच आली आहे, असं म्हणायची वेळ आली आहे. आता आणखी एका बाबाला अटक करण्यात आली आहे. स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा भोसले या भोंदूबाबाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या कारवाईबाबत अधिक माहिती दिली. आर्थिक फसवणूक आणि भोंदुगिरीच्या प्रकरणात कुर्डूवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्ह्यांची नोंद
मनोहर मामा भोसले याच्यावर यापूर्वीच ४ गुन्हे दाखल आहेत. करमाळा आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. तसेच, भोंदुगिरी आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात बारामती व दौंड पोलीस ठाण्यांतही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. आता कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक आणि भोंदुगिरी केल्याप्रकरणी नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जामिनावर असताना कुर्डूवाडी पोलिसांची कारवाई
भोंदूबाबा मनोहर भोसले याच्यावर महिलांवरील अत्याचाराव्यतिरिक्त, ‘कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करतो’ असे खोटे आश्वासन देऊन भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचेही आरोप आहेत. अत्याचार प्रकरणी अटकेत असताना बार्शी सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. सद्यस्थितीत तो जामिनावर असतानाच कुर्डूवाडी पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे.
संजय गायकवाडांच्या घरावर 28 एप्रिलला मोर्चा; रोहित पवारांचा इशारा, बुलढाण्यात ‘शिवाजी कोण होता?’चे होणार वाचन
५० हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पुण्यातुन अटक
हा भोंदूबाबा सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून फसवणूक करत होता. ‘व्यवसाय आणि उद्योगात भरभराट आणण्यासाठी पूजाअर्चा केली पाहिजे’ असे सांगून त्याने एका व्यक्तीकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. संबंधित भक्ताने मनोहर मामा आणि त्याच्या साथीदाराला ५० हजार रुपये दिले होते.
मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदारावर आर्थिक फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात कुर्डूवाडी पोलिसांनी तपास चक्रे फिरवत मनोहर भोसलेला पुण्यातुन अटक केली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा