Mahim to Bandra Flyover: तीन वर्षांपासून रखडलेल्या या उड्डाणपुलामुळे मुंबईतील उपनगरांमधून दक्षिण मुंबईत पोहोचणे सोपे होणार आहे. या 1.3 किमी लांब मार्गासाठी 220 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबईतील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी महापालिके अनेक प्रकल्पांवर कामं सुरू करत आहे. आता माहीम ते वांद्रे दरम्यान 1.3 किमी लांबीचा उड्डाणपूल उभारण्याची महापालिकेची योजना आहे. या उड्डाणपुलामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि माहीम कॉजवेवरील ट्रॅफिक जॅम कमी होणार आहे. बीएमसी हा उड्डाणपूल बांधणार आहे.
20 ते 25 मिनिटे वाचवणार
माहीम ते वांद्रे पुलासाठी 220 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या उड्डाणपुलाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा मिठी नदीवर बांधण्यात येणार आहे. यामुळे शहरातील सतत कोंडी होणाऱ्या उत्तर आणि दक्षिण कॉरिडोरवरील प्रवास सुलभ होणार आहे. उड्डाणपूल तयार झाल्या नंतर कॉरिडोरवरील प्रवासाचा वेळ 20 ते 25 मिनिटांनी कमी होण्याची शक्यता आहे.Pune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांवरून फीडर बस, 11 स्थानकांची ‘कनेकटीव्हीटी’ वाढली; पण अनियमित फेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल
वांद्रे येथील पश्चिम भागात प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी उत्तर आणि दक्षिणेला जोडणारे फक्त दोन दुवे आहे. प्रवाशांना माहीम कॉजवे किंवा वांद्रे सी लिंक टोल मार्गावरून प्रवास करावा लागतो. मुंबईतील उपनगरातून दक्षिण मुंबईत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या भागांत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे प्रवासात वेळ वाया जातो. हीच कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने उत्तर-दक्षिणेला जोडणारा तिसरा मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पश्चिम द्रुतगती महमार्ग आणि माहीम कॉजवे जंक्शनवर कोंडीमुक्त प्रवास शक्य होणार.
कसा असेल मार्ग?
मुंबईतील उत्तर आणि दक्षिण उपनगरांना जोडणारा हा पूल 1.311 किमी लांब आहे. या मार्गाचा दक्षिणेकडील भाग पश्चिम द्रुतगती महामार्गापासून सुरू होईल. महामार्गावरूल रेल्वे पुलाजवळ हा मार्ग सुरू होऊन पुढे मिठी नदीला ओलांडेल. त्यानंतर उड्डाणपूल सेनापटी बापट मार्गावर उतरेल. दरम्यान, दुसरीकडे उत्तरेकडील भाग सेनापटी बापट मार्गापासून सुरू होईल. यापुढे मिठी नदी ओलांडून वांद्रे येथील क्लोवर लीफ जंक्शनला जोडेल.
Pune News: मुंबई-बंगळुरू बायपासवर प्रवास सुस्साट! मुठा नदीवरील पुलांमुळे प्रवाशांना मिळणार दिलासा; दुसरा पूल जूनपर्यंत सेवेत
कसा होईल फायदा?
या उड्डाणपुलाचा दक्षिणेकडील भाग माहीमद्वारे उपनगरातून दक्षिण मुंबईत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी फायेदशीर ठरणार आहे. दरम्यान, उत्तरेकडील भाग वाहनचालकांना सहजपणे स्वामी विवेकानंद मार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे वरळी सी लिंकवर पोहोचता येणार आहे. या पुलासाठी पहिल्यांदा 2022मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा