• Sun. Jun 14th, 2026
    Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर आज 15 तासांचा ब्लॉक! आसनगाव–कसारा दरम्यान लोकल ठप्प; मेल-एक्स्प्रेसवर परिणाम

    Central Railway Megablock 25 April 2026: कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या कामात खर्डी यार्ड पुनर्बांधणीसाठी उंबरमाळी ते आटगावदरम्यान सिग्नलसंबंधी यांत्रिक कामे (नॉन इंटरलॉकिंग) करण्यात येणार आहेत.

    मध्य रेल्वेवर आज १५ तासांचा ब्लॉक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : आज, शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासून ते शनिवारी मध्यरात्रीनंतर (रविवारी) ३ वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गावर १५ तासांचा ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे.

    ब्लॉक वेळेत आसनगाव ते कसारादरम्यान लोकल उपलब्ध राहणार नाही. कसारा स्थानकात ये-जा करणाऱ्या लोकल टिटवाळा, आसनगाव स्थानकातून हाताळण्यात येतील. ब्लॉक वेळेत ३५ मेल-एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे. काही लांब पल्ल्यांच्या गाड्या अंशतः रद्द राहणार असून, काही पर्यायी मार्गाने धावणार आहेत. ब्लॉक वेळेत सर्व लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

    स्थानक – उंबरमाळी ते आटगाव
    मार्ग -अप आणि डाउन
    वेळ-शनिवारी दुपारी १२ ते शनिवारी मध्यरात्रीनंतर (रविवारी ३ पर्यंत)
    Maharashtra TimesMarathi Compulsion : ‘मराठी माणसाला त्रास दिला तर तुमचे गाल अन् आमचे हात’, मनसेचा कल्याणमध्ये इशारा
    ब्लॉक सुरू होण्यापूर्वी शेवटची लोकल
    शनिवारी सकाळी ८.३३ सीएसएमटी-कसारा
    शनिवारी सकाळी १०.१८ कसारा-सीएसएमटी

    ब्लॉकनंतरची पहिली लोकल
    रविवारी पहाटे ४.१९ सीएसएमटी-कसारा
    रविवारी पहाटे ३.५१ कसारा-सीएसएमटी
    Maharashtra TimesMarathi Compulsion : दहिसरमध्ये मनसे-शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर, संजय निरुपम यांच्या गाडीच्या टायरची हवा काढली
    मेल-एक्स्प्रेसवर परिणाम
    ब्लॉक वेळेत शनिवारी धावणारी गाडी क्रमांक ११०११ / १२ सीएसएमटी-धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. (१७६११) हुजूरसाहेब नांदेड-सीएसएमटी एक्स्प्रेस मनमाड स्थानकापर्यंतच धावणार असून, याच स्थानकातून (१७६१२) गाडीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

    हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक
    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्तीची कामे ब्लॉक वेळेत करण्यात येणार आहेत. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक असेल. या वेळेत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल दरम्यान आणि सीएसएमटी ते गोरेगाव / वांद्रेदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. रविवारी दिवसा सीएसएमटी ते कल्याणदरम्यान ब्लॉक असणार नाही.
    Maharashtra TimesZen Sadavarte : मंत्री गिरीश महाजनांसोबत मुंबईतल्या मोर्चात राडा करणाऱ्या ‘त्या’ महिलेच्या अडचणी वाढणार? झेन सदावर्तेकडून तक्रार दाखल
    मध्यरात्री प्रवासखोळंबा
    पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी-राम मंदिरदरम्यान सहाव्या मार्गिकेवर शनिवारी-रविवारी मध्यरात्री १० तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकवेळेत ५५ लोकल फेऱ्या रद्द राहतील. जोगेश्वरी-राम मंदिरदरम्यान मेट्रो-६साठी गर्डर बसविणे तसेच दहिसर येथे पादचारी पुलांचे काम होईल. शनिवारी रात्री १०.१५ ते रविवारी सकाळी ८.१५ या कालावधीत सहाव्या मार्गावर ब्लॉक असेल. काही गाड्या अंधेरी-बोरीवलीदरम्यान वळविण्यात येतील.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा