• Thu. Jun 18th, 2026

    Pune News: पोराच्या हातात रिक्षा, बाप मागच्या सीटवर खुशाल बसलाय; पिंपरी चिंचवडमध्ये 12-13 वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल

    Pune News: पोराच्या हातात रिक्षा, बाप मागच्या सीटवर खुशाल बसलाय; पिंपरी चिंचवडमध्ये 12-13 वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल

    Pune Minor Rickshaw Driver: दिवसाढवळ्या एक अल्पवयीन मुलगा वर्दळीच्या परिसरात रिक्षा चालवत असतानाचा व्डिडीओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड: पिंपरी- चिंचवड शहरात अल्पवयीन मुलाने रिक्षा चालवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या घटनेने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वाकड येथील फीनिक्स मॉलजवळ हा मुलगा रिक्षा चालवत असताना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हा मार्ग नेहमी प्रवासी आणि वाहनांनी गजबजलेला असल्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

    सोशल मीडियावर संताप

    व्हायरल व्हिडिओमध्ये अंदाजे 12 ते 14 वर्षांचा मुलगा रिक्षा चालवत असल्याचे दिसत आहे. त्याचे वडील मद्यधुंद अवस्थेत रिक्षेत बसलेले असून, मुलगा स्वतः वाहन चालवत त्यांना घरी नेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. पिंपरी- चिंचवड शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या घटना नवीन नसून, यापूर्वीही दुचाकी व चारचाकी चालवताना अनेक मुलांना वाहतूक पोलिसांनी पकडले आहे. मात्र, अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनासमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे.Maharashtra TimesPune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांवरून फीडर बस, 11 स्थानकांची ‘कनेकटीव्हीटी’ वाढली; पण अनियमित फेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल

    अवजड वाहनांची या मार्गावर वाहतूक

    सदर घटना वाकड परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती असून, वाकड वाहतूक पोलिसांनी व्हिडिओची पडताळणी करून संबंधित रिक्षा मालकावर गुन्हा दाखल केला आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की अशा झोनमध्ये बेपर्वाईने किंवा बेकायदेशीर वाहन चालविल्यास सहज गंभीर अपघात होऊ शकतात. या प्रकरणात परमेश्वर शंकर सूर्यवंशी (रा. वाकड) असे आरोपीचे नाव असून, त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला रिक्षा चालवू दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी नितीन बबन सूर्यवंशी यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    Maharashtra TimesJay Pawar : ‘पवार विरुद्ध पवार लढतीची आमची इच्छा नाही; आम्ही सर्व एकत्र राहावं अशी पवार कुटुंबाची भावना’, जय पवार यांचं वक्तव्य

    दरम्यान, या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन देणे कितपत सुरक्षित आहे? तसेच, अशा प्रकारामुळे गंभीर अपघात घडू शकला असता. याशिवाय, मुलगा रिक्षा चालवत असताना तो वाहतूक पोलिसांच्या नजरेत का आला नाही, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा