• Sat. Jun 6th, 2026

    Pune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांवरून फीडर बस, 11 स्थानकांची ‘कनेकटीव्हीटी’ वाढली; पण अनियमित फेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल

    Pune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांवरून फीडर बस, 11 स्थानकांची ‘कनेकटीव्हीटी’ वाढली; पण अनियमित फेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल

    Pune Feeder Bus: पुण्यात अनेक मेट्रो स्थानकांवरून फीडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी येरवाडा स्थानकापासून विसानतळापर्यंत फीडर बस उपलब्ध होती. परंतु, या बसेस 10 मिनिटांऐवजी 40 मिनिटांना येत असल्यामुळे प्रवाशांते हाल होत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: महामेट्रो पुण्यातील मेट्रो स्थानकापासून फीडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. PMPMLकडून ही फीडर बससेवा सुरू झाली आहे. पुणे मेट्रोतील प्रवाशांना लास्ट माइल कनेकटीव्हीटी मिळावी या उद्देशाने ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. अशीच सेवा मुंबई मेट्रोवरील काही स्थानाकांवरही सुरू केली होती. परंतु, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे अनेक स्थानकांवरील सेवा बंद करण्यात आली. आता पुण्यात या फीडर बसच्या अनियमितपणामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

    प्रवाशांची संख्या वाढणार

    पुणे मेट्रोला अपेक्षित इतका प्रतिसाद मिळत नाही आहे. सविस्तर प्रकल्प अहवालानुसार, प्रवाशांना लास्ट माइन कनेकटीव्हीटी उपलब्ध नसल्यामुळे मेट्रोकडे पाठ फिरवली जात आहे. परंतु, मेट्रो लाइन 3 (पिंक लाइन) हिंजवडी ते शिवाजीनगर सुरू होताच प्रवाशांची संख्या 2.75 लाखांवर जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे या वाढत्या प्रवासी संख्येसाठी फीडर बससेवा सुरू करणं महत्त्वाचं होतं.Maharashtra TimesWeather Update : राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता, वादळी वाऱ्यासह गारपीट होणार

    सध्या पुणे मेट्रोच्या 11 स्थानकांवर फीडर सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच, 23 मार्गांवर 85 पीएमपीएमएल बसेस धावत आहेत. रामवाडी स्थानकापासून आयटी पार्कदरम्यान, कर्मचाऱ्यांसाठी दोन ई-बसेस चालवण्यात येत आहेत. याशिवाय, आनंदनगर स्थानकापासून ते एमआयटी विद्यापीठापर्यंत 30 ई-स्कूटर सुरू करण्यात आल्या आहेत. या फीडर बससेवा सुरु करताना दर 5 ते 10 मिनिटांनी बस उपलब्ध होणार असल्याची माहिती महा मेट्रोचे संचालक श्रावण हार्डीकर यांनी दिली होती. त्यामुळे प्रवास सुखकर होईल अशी प्रवाशांना आशा होती.

    कोणत्या स्थानकांवरून सेवा?

    आता फीडर बससेवा सुरू होऊन काही दिवस झाले आहेत. नियमित प्रवाशांनी या फीडर बसेस अनियमित असल्याची खंत व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका, एसएनडीटी, स्वारगेट, शिवाजीनगर, रामवाडी, येरवडा आणि कल्याणीनगरसारख्या प्रमुख स्थानकांवरून फीडर बस सेवा सुरू आहे. सध्या फीडर बसेसचं नेटवर्क मजबूत करण्यासाठी महा मेट्रोने खासगी कंपन्यांशी भागीदारी केली आहे.

    Maharashtra TimesMumbai-Pune Expressway : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दोन दिवसांचा ट्रॅफिक ‘मेगाब्लॉक’, पर्यायी मार्ग कोणते?

    दरम्यान, महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सध्या अधिक मेट्रो स्थानकांवर सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती दिली. यानंतर नवीन मार्गांवर सेवा सुरू होईल. तसेच, काही महिन्यांत या सेवेच्या वारंवारतेत वाढ होईल. सध्या काही स्थानकांवर बस पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. अशा मार्गांवर रिक्षा सुरू करण्याची योजना आहे.

    40 मिनिटे बसची प्रतीक्षा

    येरवाडा मेट्रो स्थानकापासून पीएमपीएमएल विमानतळ फीडर बस सेवा अनियमित असल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे. विकास वाडके, एका नियमित प्रवाशाने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अनेक वेळा बससाठी 30 ते 40 मिनिटे वाट पहावी लागते असा आरोप केला आहे. हा कालावधी 5-10 मिनिटं असल्यास प्रवाशांना सेवाचा खरच फायदा होईल असंही त्यांनी सांगितलं.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा