Kolhapur News: कपाटातील इतर वस्तू जशाच्या तशा असल्याने चोरट्याला घराची आंतरिक माहिती असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुःखाच्या प्रसंगाचा चोरट्यांनी केला गैरफायदा; अंत्यविधी आणि जियारतच्या गर्दीतून लाखोंचे दागिने लंपास(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: दुःखाच्या प्रसंगी देखील चोरट्यांनी संधी साधून घरातील दागिने लुटल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी मंडई परिसरातील ज्येष्ठ महिला हमीदा अब्दुलमजीद खाटिक यांच्या निधनानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना चोरट्याने अंत्यविधीच्या तयारीच्या गडबडीचा फायदा घेत 16 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. लक्ष्मीपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला असून, नात्यातील व्यक्तीवर प्राथमिक संशय घेतला आहे.
लक्ष्मीपुरी मंडईतील तीन मजली इमारतीत राहणाऱ्या हमीदा अब्दुलमजीद खाटिक (वय 70 वर्षे) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांचा मुलगा इम्तियाज अब्दुलमजिद खाटीक (वय 48) आणि कुटुंबीय बुधवारी तळमजल्यावर अंत्यविधीची तयारी करत होते. मात्र नातेवाईक आणि पाहुण्यांची गर्दी असताना चोरटा वरच्या मजल्यावर जाऊन खाटिक यांच्या खोलीतील लाकडी कपाट फोडले. त्यातून 16 तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे अलंकार पळवून नेले.
सुमारे तासाभराने खाटीक कुटुंबातील सदस्य खोलीत आले, तेव्हा खोलीतील साहित्य विस्कळीत पडलेले आढळले. चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर कुटुंबीयांना दुहेरी धक्का बसला.
कुटुंबीयांनी तात्काळ लक्ष्मीपुरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर आणि सहायक पोलिस निरीक्षक खंडू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. गल्लीतील सीसीटीव्ही तपासात इमारतीच्या मागून एक संशयास्पद तरुण बाहेर पडताना दिसून आला. ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथक पाचारण केले गेले, मात्र श्वानपथक परिसरातच घुटमळले. रात्री उशिरापर्यंत फिर्याद प्रक्रिया सुरू होती. अंत्यविधीच्या गर्दीत चोरट्याने थेट दागिन्यांच्या जागेवर हल्ला केला. घरातील व्यक्ती किंवा नातेवाईकाची माहिती असलेल्या व्यक्तीने कृत्य केले असावे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध लावण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे कोल्हापूर शहर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुःखाच्या प्रसंगातही घरफोडी होत असल्याने नागरिक सतर्क झाले आहेत. पोलिसांनी आवाहन केले आहे की, कोणतीही संशयित व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना कळवावे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने चोरट्याला लवकर पकडले जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा