• Sun. Jun 7th, 2026
    गिरीश महाजनांना खडसावणारी महिला ही अभिनेत्री पूजा मिश्रा असल्याचे दावे व्हायरल, अखेर सत्य समोर

    Pooja Misrra : गिरीश महाजन यांना जाब विचारणारी महिला ही बिग बॉस ५ ची स्पर्धक आणि अभिनेत्री पूजा मिश्रा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्याने भारतीय जनता पक्षाने मंगळवारी वरळीत जनआक्रोश मोर्चा काढला. यावेळी झालेल्या वाहतूक कोंडीने त्रस्त होऊन एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. मंगळवारपासून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. संबंधित महिला ही बिग बॉस ५ ची स्पर्धक आणि अभिनेत्री पूजा मिश्रा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता, मात्र यात तथ्य नसल्याचं समोर आलं आहे.

    भाजप आयटी सेलचे आरोप आणि माघार

    भाजपच्या उत्तर प्रदेश शाखेचे सोशल मीडिया प्रमुख शशी शेखर आणि भाजपच्या मुंबई आयटी सेलच्या पल्लवी यांनी संबंधित महिला ही अभिनेत्री पूजा मिश्रा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला होता. ती बिग बॉस ५ ची स्पर्धक असून मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं या दोघांनी लिहिलं होतं. तिने सलमान खान, शत्रुघ्न सिन्हा, सनी लिओन यांच्यावर गंभीर आरोप केल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला होता. ती पेड प्रमोशन किंवा जाणूनबुजून आक्रोश करत असल्याचा प्रश्नही पल्लवी यांनी उपस्थित केला होता. शशी शेखर यांनी नंतर आपली पोस्ट डिलीट केली.

    फॅक्ट चेक

    दरम्यान, अल्ट न्यूजने यासंदर्भात फॅक्ट चेक केले असून या आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. “एका रॅलीत महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणारी ती महिला पूजा मिश्रा नाही. शशी शेखर आणि पल्लवी सीटी यांच्यासारख्या भाजपच्या ‘आयटी सेल’ सदस्यांना, असंबद्ध छायाचित्रे आणि प्रतिमांचा वापर करुन त्या महिलेची बदनामी करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत, असे दिसते. अशी पोस्ट फॅक्ट चेकर मोहम्मद झुबैर यांनी केली आहे.

    दरम्यान, या घटनेबाबत मंत्री महाजन यांनी बुधवारी आपली भूमिका मांडली. यावेळी प्रत्येक आंदोलनात जनतेला थोडाफार त्रास होतोच, असे म्हणत यापुढे त्याबाबत काळजी घेणार असल्याची सारवासारव त्यांनी केली.

    भाजपच्या आंदोलनावेळी ट्राफिक जाम

    महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर त्याविषयी आंदोलन करण्याचे भाजपने ठरविले असून, त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सायंकाळी वरळीच्या जांबोरी मैदान ते एनएससीआय डोम असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात भाजपचे सर्व मंत्री, नेते सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात कमालीची वाहतूक कोंडी झाली होती.
    Maharashtra TimesBengaluru Crime : तुला वेस्टर्न स्टाईल प्रपोज करणारे, घरी कोणी नसताना ‘प्रेमाने’ बोलावलं, बेडला बांधलं; किरण फसला, प्रेयसीने जिवंत पेटवलं

    स्थानिक महिलेने खडसावले

    त्याच दरम्यान एका महिलेने मोर्चामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे आपल्याला मुलीला शाळेतून आणण्यास अडचण होत असल्याचे म्हणत पोलिसांना जाब विचारला. तसेच, मोर्चात सहभागी झालेले मंत्री महाजन यांच्या पुढ्यात त्यांनी तातडीने रस्ता रिकामा करा, या शब्दांत आक्रोश मांडला. महाजन यांनी यावेळी संयमाची भूमिका घेत लवकरच रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिले. या घटनाक्रमाचे चित्रीकरण मंगळवारी रात्री समाजमाध्यमांत कमालीचे व्हायरल झाले.

    महिला विधेयकावरून महायुती आक्रमक, जनआक्रोश मोर्चा, वाहतूक कोंडी, नागरिक भडकले

    गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

    बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी याविषयी भाष्य केले. ते म्हणाले, महिला आरक्षण विधेयक पाडणाऱ्या काँग्रेस आणि विरोध पक्षांमध्ये एक प्रकारचा संताप आणि आक्रोश होता. तो व्यक्त करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली हे मान्य करावे लागेल. पण आमच्या मोर्चाचा मार्ग स्थानिक पोलिसांकडून आधीच मंजूर करण्यात आला होता. तसेच, वाहतूक इतर मार्गांवरही वळविण्यात आली होती तरीही कोंडी झाली हे मान्य करावे लागेल, असे ते म्हणाले.

    यापुढे काळजी घेऊ

    एका महिलेने येऊन अतिशय अरेरावीच्या भाषेत रस्ता कसा बंद केला, त्यांना कसा त्रास होतो, असे सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी वापरलेली भाषा आणि शब्द असंसदीय होते. तरीही मी, पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची व्यथा समजून घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या ऐकण्यास तयार नव्हत्या, त्यांनी रस्त्यावरील बाटलीही महिला मोर्चेकऱ्यांवर फेकून मारली, असे महाजन म्हणाले. मुंबईत याआधीही मोर्चे-आंदोलने झाले असून कधीच अशी घटना घडली नव्हती. पण, यापुढे आम्ही जनतेला आंदोलनाचा त्रास होणार नाही, याची काळजी घेऊ, असे महाजन म्हणाले.
    Maharashtra TimesDelhi Crime : रात्री 10.30 ला विवाहित शेजारणीवर जबरदस्ती, सकाळी IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार करुन संपवलं; मित्राने खायला थांबवताच सटकला

    महापौरांकडून दिलगिरी

    मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही आंदोलनातील कोंडीप्रकरणी बुधवारी काही नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल मुंबईची प्रथम सेविका म्हणून मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे ‘एक्स’ या समाजमाध्यमातून सांगितले. हा महिलांच्या हक्कांचा आक्रोश होता. त्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक भगिनीचा, आमचा रोष ‘ती’ भगिनी आणि सर्व नागरिक समजून घेतील, अशी माफक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा