BJP Vijay Chaudhari PA Arrested : या ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या विजय चौधरी यांचा स्वीय सहायक निघाला आहे. त्याला आता पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विजय चौधरी पीए यश टिपरेला पुण्यातून अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. भाजपमधील हा पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणणाऱ्या या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाला आता एक मोठे वळण मिळाले आहे. चौधरी यांच्या खुद्द खासगी सचिवानेच (PA) ही क्लिप लीक केल्याचं तपासात निष्पन्न झालं असून, त्याला पुणे येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आलं आहे. यश टिपरे असं या संशयित सचिवाचं नाव आहे.
व्हॉट्सॲप ग्रुप्सवर पाठवण्यात आल्या?
विजय चौधरी यांच्या मुलाने दिलेल्या अधिकृत फिर्यादीनंतर नंदुरबार पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तात्काळ चौकशीची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित यश टिपरे याचा माग काढत पोलिसांनी त्याला पुण्यातून बेड्या ठोकल्या. अटकेनंतर त्याला पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी नंदुरबार येथे आणलं आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील मूळ कारस्थान शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
CJP Protest: तुमचा कॅप्शन गेम खूपच कमजोर! CJP आंदोलनातील मराठमोळ्या तरुणीचा स्वॅग; भाजपला सणसणीत प्रत्युत्तर या कथित ध्वनीफिती नेमक्या कोणत्या व्यक्तींना आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर पाठवण्यात आल्या? केवळ PAने स्वतःच्या मर्जीने हे केले की यामागे पक्षातील किंवा बाहेरील काही मोठ्या राजकीय व्यक्तींचा हात आहे? या व्यतिरिक्त आणखी काही नेत्यांच्या क्लिप्स लीक झाल्या आहेत का, याचा शोध घेतला जातं आहे. दरम्यान, या अटकेमुळे नंदुरबार भाजपमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. यश टिपरे याच्या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती आणि इतर संशयितांची नावे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील कारवाई होण्याती शक्यता
तपासादरम्यान या कथित ऑडिओ क्लिप नेमक्या कुणाकुणाला पाठवण्यात आल्या, त्या व्हायरल करण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का ? तसेच त्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दरम्यान, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह अथवा तपासाधीन माहिती व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील तपासानुसार आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा