Kolhapur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच कोल्हापुरात एक मोठी घटना घडली आहे. या घटनेत वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
दारुच्या व्यसनाने वडिलांनी मुलाची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : दारूच्या व्यसनातून कुटुंबाला त्रास देणाऱ्या 21 वर्षीय जुनेद गफूर पठाणचा जन्मदात्या वडिलाने धारदार चाकूने भोसकून हत्या केली आहे. सोमवारी 20 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता विक्रमनगरातील स्वामी समर्थ कॉलनीत घडलेल्या या संतापजनक घटनेत जुनेद गंभीर जखमी होऊन सीपीआर रुग्णालयात मृत्यू पावला. राजारामपुरी पोलिसांनी काल मंगळवारी संध्याकाळी संशयित वडील गफूर सुलतान पठाण (वय 45) याला अटक केली असून, आज बुधवारी त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सुरुवातीला जुनेदचे वेगळाच कारणाने निधन झाल्याचं सांगणाऱ्या गफूरने पोलिसी खाक्या दाखवताच हत्येची कबुली दिली आहे.
शिवजयंती मिरवणुकीनंतर सुरू झाला वाद
सोमवारी 20 एप्रिल रोजी शिवजयंतीनिमित्त विक्रमनगरातील मिरवणुकीत जुनेद दारूच्या नशेत नाचत असल्याची माहिती गफूरला मिळाली. चिडून त्याने मुलाला ओढत घरी आणलं. दारू पिण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरजोरात वाद झाला. यावेळी जुनेदने वडिलांना कानशिलात मारली, तर रागावलेल्या गफूरने घरातील धारदार चाकू काढून मुलाच्या उजव्या कडेवर, किडनीजवळ भोसकले. रक्ताच्या थारोळ्यात जुनेद जमिनीवर पडला. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ सीपीआर रुग्णालयात नेलं; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. Pune News : बाबा माझी परीक्षा घेतायत का? आंबे खरेदीवरुन कौस्तुभ गनबोटेंच्या लेकाचा प्रश्न, आई निरुत्तर; वर्षभरानंतरही दुःखाची छाया
खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल
घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांना शिवजयंती मिरवणुकीत ट्रॉलीचा पोटाला धक्का लागून जुनेदचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र, मृत्यू संशयास्पद वाटल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनाचा आदेश दिला. राजारामपुरी पोलीस निरीक्षक सुजित होडगर, सहायक निरीक्षक रणजित पाटील, पोलीस नाईक शाहू तळेकर, अमोल पाटील, विशाल शिरगावकर यांच्या तपासात खोटी माहिती उघड झाली. त्यामुळे काल मंगळवारी सकाळी गफूरला ताब्यात घेतल्यानंतर खाक्या दाखविताच त्याने हत्येची कबुली दिली. संध्याकाळी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला.
वारंवारच्या त्रासाला सर्वच कंटाळले
स्वामी समर्थ कॉलनीतील नुराणी मस्जिदजवळील गल्लीत गफूर पठाण कुटुंब राहते. गफूरचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे, तर जुनेद भंगार विक्रीच्या दुकानात काम करत होता. मात्र, जुनेदचे दारूचे व्यसन कुटुंबासाठी कलंक ठरले होते. तो मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन वृद्ध आजी, आई-वडील, भावंडांना शिवीगाळ करून मारहाण करत असे. सोमवारी सकाळी आणि सायंकाळीही त्याने वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशा वारंवारच्या त्रासाला कंटाळून गफूरने हे पाऊल उचलल्याचे पोलीस सांगतात. पत्नी आणि दोन मुलांसह राहणाऱ्या गफूरच्या या कृत्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Nashik Crime : ‘मला पण एक सिगारेट घे रे’; नकार देताच बेदम मारहाण, नाशिकमध्ये तरुणाला मध्यरात्री संपवलं दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी करून चाकू जप्त केला असून, कुटुंबीयांच्या जबाबांची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, दारू व्यसनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील वादांना कायदेशीर मार्गाने सोडवण्याचं आवाहन पोलीस करत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा