राज्यात पुढचे चार दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची भीती आहे. पुढच्या चार दिवसांत विदर्भ, मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुढच्या चार दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचं ऊन पडत आहे. असं असलं तरी काही ठिकाणी आता वातावरणात बदल होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. काही ठिकाणी अजूनही कडाक्याचं ऊन पडत आहे. पण हे ऊन कमी होऊन अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या पाच दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गाारपीटची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुढच्या चार दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यात अनेक भागांमध्ये गारपीट
राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तापमानाचा पारा हा 40 वर गेला होता. पण आज अचानक तापमानात बदल झाला आणि पावसाने एन्ट्री घेतली. पुण्यातील अनेक भागांमध्ये आज गारांचा पाऊस पडला. अचानक आलेल्या गारांच्या पावसामुळे नागरीक धास्तावले. गारपीटमुळे काही काळ वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवली. तसेच पुण्यात काही ठिकाणी पाऊस देखील पडला. पुढचे चार दिवस हा पाऊस ठाण मांडून राहण्याची शक्यता आहे.
मुंबईतही पाऊस पडणार
मुंबईत यंदा अवकाळी पाऊस पडलेला बघायला मिळाला नव्हता. पण आता मुंबईतही पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत 23 आणि 25 एप्रिल या दोन दिवशी दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गरमी होण्याची शक्यता आहे. तसेच 24 एप्रिलला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दिवशी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा अंदाज नेमका काय?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 23 आणि 24 एप्रिल या दोन दिवशी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वातावरण हे उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. तसेच दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर हलक्या सरिंची किंवा विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुण्यात पुढचे तीन दिवस सातत्याने अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुण्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात 24 आणि 25 एप्रिलला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात 25 एप्रिलला पाऊस पडण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात 24 एप्रिलला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नांडेड जिल्ह्यात 23 आणि 25 एप्रिलला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर लातूर जिल्ह्यात 25 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. धाराशिवमध्ये पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा