Illegal Firecracker Factory Explosion: पालघर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एका अनधिकृत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, पालघर: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोन्सई गावात मंगळवारी (२१ एप्रिल २०२६) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास फटाके तयार करणाऱ्या तात्पुरत्या युनिटमध्ये भीषण स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जुन्या फार्महाऊसमधील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या युनिटमध्ये स्फोटानंतर भीषण आग लागली आणि काही क्षणांतच संपूर्ण शेड कोसळून मोठे नुकसान झाले. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की अवशेष दूरवर उडून गेले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सुतळी बॉम्ब तयार करताना स्फोट
आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या वेळी सुमारे ३५ कामगार, ज्यात बहुसंख्य महिला होत्या, ‘सुतळी बॉम्ब’ (धाग्याने बांधलेले फटाके) तयार करत होते. रासायनिक मिश्रणाची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक स्फोट होऊन आग भडकली. काही कामगारांना किरकोळ दुखापतही झाली असल्याचे समोर आले आहे.Kerala Blast: फटाक्याच्या कारखान्यात एकापाठोपाठ भीषण स्फोट, आसमंतात धुराचे लोट; 13 जणांचा अंत, अनेक जण भाजले
या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर ९० टक्के भाजलेल्या मोनिका सचिन पडवळे (वय ३०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींमध्ये मोनिका महेंद्र जाधव (३०), जागृती जगदीश गविते (२७), प्रतिभा प्रताप पवार (३०) आणि मोनिका मोहन वर्दी (२५) यांचा समावेश असून, त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर काहींना पुढील उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालय आणि इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कारखाना काही दिवसांपूपृर्वीच सुरू
घटनेनंतर वाडा पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य वेगाने राबवत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, त्यामुळे आणखी मोठी हानी टळली. प्राथमिक तपासात हा कारखाना १० एप्रिलपासूनच सुरू झाल्याचे समोर आले असून कच्चा माल बाहेरून आणला जात होता. तसेच जामघर, कोन्सई, पालसई आणि आलमण या आसपासच्या गावांमधून मजूर कामावर ठेवले होते. या युनिटकडे आवश्यक परवाने होते का, तसेच सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबत पोलीस सखोल चौकशी करत असून कारखान्याच्या मालकाचा शोध सुरू आहे.
Asmita Mishra : विवाहितेने आयुष्य संपवलं, अस्मिताच्या वडिलांचे गंभीर आरोप, पोलिसांचा तपास संशयास्पद, हायकोर्टाचा मोठा निर्णय
दरम्यान, या घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात २७ फेब्रुवारी २०१४ रोजी घडलेली भीषण दुर्घटना पुन्हा चर्चेत आली आहे. त्या वेळी संध्याकाळी सुमारे ४.३० वाजता भायमळा गावातील फटाके कारखान्यात स्फोट होऊन ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जखमी झाले होते. स्फोटानंतर कारखान्याला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले होते. पालघरमधील ताज्या घटनेमुळे फटाके उद्योगातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, बेकायदेशीर कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा