• Sun. Jun 7th, 2026

    Mumbai News: दोन उड्डाणपुलांमुळे मुंबईतील वाहतूककोंडी फुटणार! भायखळा ते सीएसएमटी प्रवास अवघ्या 10 मिनिटांत; कसे असतील मार्ग?

    Mumbai News: दोन उड्डाणपुलांमुळे मुंबईतील वाहतूककोंडी फुटणार! भायखळा ते सीएसएमटी प्रवास अवघ्या 10 मिनिटांत; कसे असतील मार्ग?

    South Mumbai Traffic: दक्षिण मुबंईतील कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने दोन महत्त्वाच्या पुलांचं काम हाती घेतलं आहे. माझगाव ते भायखळा जोडणाऱ्या या पुलांमुळे फोर्ट परिसर ते भायखळामधील अंतर कमी होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई महापालिकेने शहरांत मोठ्या प्रमाणात गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत भायखळा आणि माझगावला जोडणारे दोन नवीन पूल तयार करण्यात येणार आहेत. मुंबईतील अतिगर्दीचे ठिकाण असलेल्या या दोन भागांना जोडणाऱ्या या पुलांमुळे वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

    कसे असतील पूल?

    सायंकाळी गर्दी असताना भायखळा आणि माझगाव येथे प्रचंड वाहतूक कोंडी होती. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी भायखळा येथे 916 मीटर लांबीचा केबल स्टेड पूल बांधण्याची योजना आहे. याच पुलाला माझगावशी 892 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाने जोडण्यात येणार आहे. या दोन पुलांमुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.Maharashtra TimesMumbai-Nanded Vande Bharat: ‘मुंबई-नांदेड वंदे भारत’ अधिक वेगवान होणार! ट्रेनच्या वेळापत्रकात बदल; प्रवासात वेळ वाचणार

    भायखळा येथे 103 वर्ष जुन्या वाय पुलाच्या जागी बीएमसीने एका नव्या केबल-स्टेड पुलाचा प्रस्ताव मांडला आहे. भायखळा ते माझगाव दरम्यान एलिव्हेटेड कनेकटीव्हीटी नसल्यामुळे वाहनचालकांना रिचर्डसन आणि क्रुडाल जंक्शन आणि सब्बू सिद्दिकी जंक्शनमधून प्रवास करावा लागतो. त्यामुळे कोंडीची समस्या उद्भवते. या नव्या पुलांमुळे जेजे उड्डाणपुलापासून आणखी एक उड्डाणपूल तयार केला जाईल. हा पूल भायखळा येथील आगामी वाय उड्डाणपुलाला जोडेल. यामुळे दक्षिण मुंबईत एका नव्या हाय स्पीड कॉरिडोरची निर्मिती होईल.

    10 मिनिटांत प्रवास

    या केबल स्टेड पुलावर सहा पदरी वाहतूक सुरू असेल. हा पूल एकूण 916 मीटर लांब असेल. जुन्या पुलापेक्षा अधिक रुंद आणि भविष्यातील वाढती वाहन संख्या लक्षात घेता फायद्याचा ठरेल. या पुलावर प्रवाशांसाठी सेल्फी पॉईंट असेल आणि रोशनाई केली असेल. दरम्यान, दुसरा 848 मीटर उड्डाणपूल 4 पदरी असेल. हा संपूर्ण कॉरिडोर तयार होताच सीएसएमटी (फोर्ट) ते भायखळा दरम्यान अंतर कमी होणार आहे. सध्या 30 ते 45 मिनिटे लागणारा प्रवासाचा वेळ अवघ्या 10 मिनिटांवर येणार आहे.

    Maharashtra TimesMumbai Water Cut: ऐन उन्हाळ्यात मुंबईत पाणीकपात! बुधवारी 18 तास पुरवठा बंद; दादर, भायखळा, परळसह अनेक भागांना फटका

    कधी होणार काम पूर्ण?

    या नवीन केबल-स्टेड पूलाचं काम 78 टक्के पूर्ण झालं असून तो नोव्हेंबर 2026पर्यंत प्रवासासाठी खुला करण्यात येईल. दुसऱ्या उड्डाणपुलासाठी वर्क ऑर्डर जारी करण्यात आले आहेत आणि बांधकाम सध्या सुरू आहे. हा पूल तयार करण्यासाठी 2028ची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे काही वर्षांत दक्षिण मुंबईतील प्रवास सुखकर होणार आहे.

    या प्रकल्पासाठी 1,841 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. भायखळा येथील केबल-स्टेड पुलासाठी 280 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर दुसऱ्या उड्डाणपुलासाठी 1,561 कोटींचा खर्च येणं अपेक्षित आहे. हा केबल स्टेड पूल रेल्वे रुळांवरून जाणार आहे. या भागाचं डिझाइन सध्या प्रलंबित असल्यामुळे खर्च कमी आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा