Devendra Fadnavis : विरोधकांचा खरा चेहरा उघडा पडला! महिला आरक्षण मुद्द्यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांची टीका
भाषणापुरता महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाचा वापर करणाऱ्यांचे खरे चेहरे आता उघडे पडले आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला. ‘२०२३मध्ये महिला आरक्षणाचे विधेयक संमत झाले, तेव्हा जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना पूर्ण करून हे विधेयक लागू करण्याबाबात सुधारणा झाली होती. त्यामुळे आता आलेले विधेयक हे अचानक आलेले नाही. कोविडमुळे जनगणना लांबली. मागचा अनुभव लक्षात घेता जनगणना, मतदारसंघ पुर्नरचना यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता महिला आरक्षण लागू करणे लांबणीवर जाण्याची शक्यता होती. त्यामुळे संसदेने २०२३ ला घेतलेल्या निर्णयाप्रमाणे, २०११ च्या जनगणनेनुसार मतदारसंघ फेररचना करून कोणत्याही स्थितीत २०२९ ला महिला आरक्षण विधेयक लागू करावे आणि २०२९ ला सर्वाधिक संख्येने संसदेत महिला निवडून येतील, अशा शुद्ध भावनेने याची होती.
