• Mon. Jun 15th, 2026
    Beed Crime : अजित पवार गटाच्या नेत्यावर 5-6 जणांचा मध्यरात्री भीषण हल्ला, तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

    Beed Crime News : बीड जिल्ह्याच्या परळीत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते संजय जाधव यांच्यावर ५ ते ६ अज्ञात इसमांनी कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

    अजित पवार गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे, बीड: बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संजय जाधव यांच्यावर काल १९ एप्रिल रोजी रात्री उशिरा ५ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा प्रकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात संजय जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

    नेमकं काय घडलं?

    या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास संजय जाधव हे गोवर्धन हिवरा ते सिरसाळा रोडवर असलेल्या आपल्या शेताकडून घराकडे नेहमीप्रमाणे जात होते. ते गोवर्धन शिवारात आले असता, दबा धरून बसलेल्या ५ ते ६ अज्ञात इसमांनी त्यांना अचानक अडवून त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने जाधव यांच्यावर सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केले या हल्ल्यात संजय जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळले.

    उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

    परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी जाधव यांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आल्याचे सांगण्यात आले आहे. बाजार समितीच्या माजी पदाधिकाऱ्यावर असा हल्ला झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.

    Maharashtra TimesVirar Alibaug Corridor Toll Rates : विरार-अलिबाग कॉरिडॉरला हिरवा कंदील! चकाचक 8 पदरी रस्ता अन् मेट्रोचा संगम, पण टोल किती लागणार?

    जुन्या वादातून हल्ला?

    नेमका हल्ला कोणी आणि का केला असावा या हल्ल्यामागे नेमके कारण काय असावे, याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. तर काही दिवसांपूर्वीच संजय जाधव यांनी गावातील एका तरुणाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर, हा हल्ला त्याच वादातून झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

    व्हायरल व्हिडिओची चर्चा

    तो व्हायरल व्हिडिओ आणि आता झालेला हा प्राणघातक हल्ला या दोन्ही गोष्टींमध्ये तर्क वितर्क लावला जात असून सध्या जिल्ह्यात या अनुषंगाने मोठी चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात आहे. मात्र नेमके कारण काय अद्याप समोर आले नाही.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा