Panvel Railway Station: नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्थानकावर एक मोठा अनर्थ टळला आहे. आठवड्याच्या सुरूवातीलाच साकाळी लिफ्ट कोसळल्याने मोठा खोळंबा झाला. पण सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.
अमुलकुमार जैन, पनवेल: सकाळी गर्दीच्या वेळी पनवेल रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्टमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांसह ही लिफ्ट अचानाक मध्येच बंद पडली. यावेळी लिफ्टमध्ये 4 प्रवासी अडकल्यामुळे सोमवारी सकाळी पनवेल रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती. लिफ्टच्या देखभालीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याचे आरोप केले जात आहेत.
10 मिनिटांत प्रवाशांची सुटका
वर्दळीच्या पनवेल रेल्वे स्थानकावर सकाळच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 7वरील लिफ्ट अचानक कोसळल्याने चार प्रवासी आत अडकले. सुदैवाने तत्पर बचावकार्यामुळे सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही लिफ्ट वरून खाली येत असताना अचानक बिघाड होऊन कोसळली. त्या वेळी लिफ्टमध्ये चार प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले आणि केवळ 10 मिनिटांत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली.Dombivli Local Train Derailment Update : डोंबिवलीमध्ये लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल
पनवेल स्थानक हे लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल व मेमू ट्रेनमुळे नेहमीच गजबजलेले असते. विशेषतः आठवड्याच्या सुरुवातीला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा ठिकाणी लिफ्टसारख्या सुविधेची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असतानाही देखभालीतील त्रुटी उघड झाल्याचे दिसून येते. यापूर्वीही मुंबई व उपनगरांत लिफ्ट कोसळण्याच्या घटना घडल्या असून काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. तरीही अनेक ठिकाणी लिफ्टची नियमित तपासणी व देखभाल होत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी
हार्बर रेल्वे मार्गावर जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या एसी लोकलमुळे आधीच प्रवाशांचा सकाळी खोळंबा होतो. सकाळी 9च्या दरम्यान निघणारी एसी लोकल नेहमी विलंबाने सुटत असल्यामुळे पुढील साधारण लोकलचं वेळापत्रक कोलमडतं आणि स्थानकावर नेहमी गर्दी होते. त्यात आता सुरू झालेल्या अमृत भारतमुळेही प्रवाशांची गर्दी वाढली आहे. सोमवारी सुटणाऱ्या या ट्रेनमुळे पनवेल स्थानकावर लोकल, मेमू आणि अमृत भारतमुळे स्थानकावर अनेकदा चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होते. त्यात अशा दुर्घटनांमुळे प्रवाशांना आणखी समस्यांना सामोरे जावे लागत आहेत.
Mumbai Local: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, गर्दी गायब होणार; CSMT ते कल्याण आणि चर्चगटपासून विरारपर्यंत थेट भुयारी लोकलसाठी हालचाली
दरम्यान, या दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक बिघाड की निष्काळजीपणा, याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे स्थानकांवरील लिफ्ट व इतर सुविधांची नियमित तपासणी आणि कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा