Nashik TCS Case : ‘तुझा नवरा शहराबाहेर असतो, तर तू सर्व एकटीच कशी सांभाळतेस? तुला भीती वाटत नाही का? तुला कशाचीही गरज भासल्यास, मी कधीही मदतीसाठी तयार आहे'” असं आरोपी म्हणत असल्याचं पीडितेने सांगितलं.
तक्रारदार महिलेने आपल्या जबाबात म्हटलं आहे की, २० जून २०२५ रोजी ती नाशिकमधील ‘टीसीएस’मध्ये ‘असोसिएट’ म्हणून रुजू झाली. २४ जूनपासून तिचं प्रशिक्षण शाहरुख कुरेशी व अन्य एका सहकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालं. या कालावधीत लोन्स विभागातील टीम लीडर असलेल्या रजा मेमन याने प्रशिक्षणाशी संबंधित कोणतीही अधिकृत भूमिका नसतानाही वारंवार प्रशिक्षण कक्षात प्रवेश केला आणि तिच्याबद्दल वैयक्तिक तसंच सूचक शेरेबाजी केली, असा आरोप तिने केला आहे.
‘नवरा घरी नसतो, मी मदतीला तयार’
“तो विचारायचा, ‘तुझा नवरा शहराबाहेर असतो, मग तू सर्व काही एकटीच कशी सांभाळतेस? तुला भीती नाही वाटत का? तुला कशाचीही गरज भासल्यास, मी कधीही मदतीसाठी तयार आहे'” असं तिने सांगितलं. तिने पुढे असाही आरोप केला की, रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी या दोघांनीही तिच्या लग्नाबाबत प्रश्न उपस्थित केले; तिचं लग्न ‘घरच्यांनी ठरवून झालेलं आहे की प्रेमविवाह’ असं त्यांनी विचारले आणि तिच्या खाजगी आयुष्याबद्दल सूचक शेरेबाजी केली. मेमनने तिला ‘प्लेअर’ असं टोपणनाव दिलं होतं आणि कार्यालयात वारंवार तो तिला त्याच नावाने हाक मारायचा, असाही आरोप करण्यात आला आहे. मेमन तिच्या अगदी जवळ उभा राहून, “जर मी तुझ्या नवऱ्याच्या जागी असतो, तर तुला असं एकटं कधीच सोडलं नसतं” अशा प्रकारची शेरेबाजीही करत असे.
खांद्यावर हात, बळजबरी मिठी
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, तक्रारदार मिहिला सप्टेंबर २०२५ मध्ये ऑन-द-जॉब ट्रेनिंगसाठी गेली आणि नंतर तिला प्रोडक्शन विभागात रुजू करण्यात आलं. या काळात दुसऱ्या टीममधील तिचा सहकारी आसिफ अन्सारी, न बोलावता वारंवार तिच्याजवळ येऊ लागला आणि तिच्या बाजूला बसू लागला. तिने अन्सारीवर वारंवार शारीरिक जवळीक साधण्याचा आणि अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप केला. “तो मुद्दाम माझ्या शरीराला स्पर्श करायचा, माझा हात धरण्याचा प्रयत्न करायचा, माझ्या मांडीवर किंवा खांद्यावर हात ठेवायचा” असं तिने सांगितलं. तसंच, एकदा त्याने मला ‘बळजबरीने’ मिठी मारली होती, असंही तिने पुढे सांगितलं.
Pune Crime : आत्याकडे लहानाची मोठी, तिच्याच मुलाशी लग्न; पुण्यात 21 वर्षीय विवाहितेने जीव दिला, कदम मायलेकावर गुन्हा
शरीरसुखाची मागणी
आपण विवाहित असल्याचे माहीत असूनही अन्सारीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. “तुला मी आवडत नाही का? तुझ्या नवऱ्यापेक्षा मी अधिक देखणा आहे. माझ्यासोबत बाहेर चल. जरी काही घडलं, तरी कोणालाही काही समजणार नाही,” असं त्याने म्हटल्याचा आरोप महिलेने केला. तिने सांगितलं की, दुपारच्या जेवणाच्या सुट्ट्यांमध्ये तो सतत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असे, तिच्या अगदी जवळ बसत असे आणि “तुझ्या काही शारीरिक गरजा असतील, तर त्या मी पूर्ण करेन,” अशा प्रकारच्या टिप्पण्या करत असे.
Jay Pawar यांचा ग्रामस्थांशी संवाद, ‘वडिल असून वेळ घेऊनच बोलायचो…’ अजितदादांसोबतचा किस्सा
धर्मावरुन टिप्पणी
अन्सारीने तिच्या धर्माला लक्ष्य करुन आक्षेपार्ह विधानं केल्याचा आरोपही तिने केला. तिच्या जबाबानुसार, तो म्हणाला की “तुमच्या धर्मात स्त्रियांवर अत्याचार होतात, कारण त्या बुरखा परिधान करत नाहीत.” तसेच, त्याने हिंदू देवतांविषयीही अपमानकारक शेरे मारले; त्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं तिने नमूद केलं.
जानेवारी २०२६ मध्ये मकर संक्रांतीच्या काळात, अन्सारीने आपल्या साडीवर टिप्पणी करत असं म्हटलं की “तुझ्या ब्लाउजची डिझाइन छान आहे. जर याची लेस काढली, तर तर पूर्णच ‘शो’ होईल” असा आरोप तिने केला आहे.
Amravati Crime : प्लेबॉय अयान अहमदची ‘क्रेझ’ कायम, इन्स्टा फॉलोअर्स धपाधप वाढले; तीन मोबाइलमधील डेटा रिकव्हर
तक्रारदार महिलेने तौसीफ अत्तार याचेही नाव घेतले असून, तिच्या टीमचा भाग नसतानाही तो दररोज तिच्या डेस्कपाशी येत असे, तिच्यासाठी खाण्याचे पदार्थ आणत असे आणि लैंगिकदृष्ट्या सूचक शेरेबाजी करत असे, असा आरोप तिने केला आहे. आपल्याकडे अश्लील नजरेने पाहत असताना, तो डबल मीनिंग टिप्पण्या करत असे, असंही तिने नमूद केलं आहे.
