• Sat. Jun 6th, 2026
    Bhendwal Prediction 2026 : युद्ध, देशाचं नेतृत्व ते पाऊस अन् शेतकऱ्यांसमोरील संकट; भेंडवळच्या घटमांडणीतील भाकिताची चर्चा

    Bhendwal Ghatmandani 2026 : ३५० वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भविष्य जाहीर झाले आहे. यंदा देशाचा ‘राजा’ कायम राहणार असला तरी संरक्षणाबाबत चिंतेचे संकेत आहेत. पाऊस आणि पिकांची स्थिती कशी असेल? याबाबतचं भाकितही समोर आलं आहे.

    युद्ध, देशाचं नेतृत्व ते पाऊस अन् शेतकऱ्यांसमोरील संकट; भेंडवळच्या घटमांडणीतील भाकिताची चर्चा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमोल सराफ, बुलढाणा : गेल्या ३५० वर्षांपासून अखंड सुरू असलेली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजाचे लक्ष लागून राहिलेली भेंडवळ येथील ऐतिहासिक घटमांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली. विदर्भातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे पारंपारिक पद्धतीने पार पडलेल्या या विधीतून आगामी वर्षाचे पीक-पाणी, पाऊसमान आणि देशाच्या राजकीय-सामाजिक स्थितीचे महत्त्वपूर्ण भाकीत वर्तवण्यात आले आहे.

    राजकीय भाकित: ‘राजा’ची खुर्ची सुरक्षित, पण संघर्षाचे सावट

    घटमांडणीतून निघालेल्या निष्कर्षानुसार, देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान आपल्या पदावर कायम राहतील. मात्र, आगामी काळात ते मोठ्या मानसिक किंवा राजकीय तणावाखाली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच, देशाची आर्थिक स्थिती फारशी मजबूत राहणार नाही, असेही संकेत या विधीतून मिळाले आहेत.

    देशाची सुरक्षा आणि जागतिक तणाव

    बदलत्या हवामानासोबतच सध्याच्या जागतिक परिस्थितीचे प्रतिबिंबही या घटमांडणीत उमटले आहे.
    संरक्षण व्यवस्था: देशाची संरक्षण स्थिती कमकुवत राहण्याची चिन्हे असून संरक्षण खात्यावर मोठा ताण असेल.
    आंतरराष्ट्रीय पडसाद: इराण-अमेरिका तणावासारख्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमावर्ती भागात तणाव वाढू शकतो.
    पाऊसमान: जूनमध्ये दमदार सुरुवात, पण महापुराचा धोका

    Maharashtra TimesDombivli Local Train Derailment Update : डोंबिवलीमध्ये लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल

    पावसाबाबत संमिश्र अंदाज वर्तवण्यात आला आहे

    जून: सुरुवातीला पावसाचा जोर भरपूर राहील.
    जुलै: पाऊस सर्वसाधारण असेल.
    ऑगस्ट आणि सप्टेंबर: पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.
    इशारा: पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक भागात महापुराचा धोका निर्माण होऊन पिकांचे नुकसान होऊ शकते.

    पीक परिस्थिती: कापूस-तीळ जोमात, पण रोगराईचे संकट

    यंदा पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याने शेतकऱ्यांसाठी हे वर्ष आव्हानात्मक ठरू शकते, असा अंदाज भेंडवळने वर्तवला आहे.

    भरघोस पिके: कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरीचे उत्पादन भरपूर होईल आणि त्यांना भावही चांगला मिळेल.
    मध्यम पिके: ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण राहतील.

    ३५० वर्षांची अखंड परंपरा

    पूर्णा नदीकाठी होणारी ही घटमांडणी निसर्गाच्या लहरीपणाचा अंदाज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आशेचा किरण मानली जाते. चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. बदलत्या हवामानाच्या काळातही या पारंपरिक अंदाजांकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा