Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरुन ट्रॅव्हल्स चालविताना बसचालक व वाहक एवढे गुंग झाले की बस उलटली. या अपघातात २ वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू, तर १७ प्रवासी जखमी झाले आहेत.
काय घडलं?
पीयूष यशपाल राठोड (२), असे मृत बालकाचे नाव आहे. पनवेल येथून एमएच २९ बीई ३२३३ क्रमांकाची ट्रॅव्हल्स रात्री समृद्धी महामार्गाने नागपूरकडे निघाली होती. रविवारी पहाटे तीन वाजता ट्रॅव्हल्सचा चालक बदलला. हा चालक ट्रॅव्हल्स चालवित असताना मोबाइलवर गाणे लावून रील बनवित होता. वाहकदेखील रीलमध्ये सहभागी झाला. याचदरम्यान पावणेसहा वाजताच्या सुमारास फर्दापूर टोल नाक्याजवळील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि एकदम ब्रेक मारल्यामुळे ट्रॅव्हल्स उलटली. दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर या अघातात जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर अर्धा तास एकही डॉक्टर उपस्थित नसल्याने संताप व्यक्त झाला.
Latur Crime : दोन चुलत भाऊ खेळण्यासाठी गेले, पुन्हा परतलेच नाहीत, एकाचं पार्थिव घराशेजारी, दुसरा बेपत्ता; लातूरमध्ये अल्पवयीन लेकरांसोबत काय घडलं?
जखमींची नावे
अपघातात अस्वद अहमद महेबूब अहमद (११) रा. पुसद, सुशील खडसे, रूपचंद गजानन बावनकुळे हे गंभीर जखमी झाले. यासोबतच वैभव धुळे (२४) रा. पुसद, शांती संजय (३०) रा. दिग्रस, विजय राठोड (५०) रा. मुंबई, किरण यशपाल राठोड, आशा देवकर, किशन चव्हाण (२२), मैफूज अहमद (४८), उमीहाणी अहमद (४), योगिता रूपचंद बावनकुळे, अविनाश राठोड, राजेश चव्हाण, लवकित चव्हाण, पूजा राठोड, ध्रुवी राठोड हेदेखील जखमी झाले आहेत.
Jalna Crime : वडील बेपत्ता असल्याची तक्रार, लेकीचा धमक्या मिळाल्याचा आरोप; पहाटे बापाचं पार्थिव आढळलं
…आणि कारवर कोसळली
ट्रॅव्हल्सचालकाचा निष्काळजीपणा कारमधील कुटुंबीयांच्या जीवावरदेखील बेतला. मेहकरकडून नागपूरकडे निघालेल्या एमएच ४० डीई १३४८ क्रमांकाच्या कारवर समोरील बाजूने ट्रॅव्हल्स निसटती कोसळली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी कारमधील रूपचंद बावनकुळे व त्यांचे कुटुंब जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
