आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर संजय गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी कुठेही हातवारी केले नाहीत, असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बुलढाणा : आमदार संजय गायकवाड यांच्यावर एका वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये अश्लील हावभाव करणे, अश्लील हातवारे करणे अशा प्रकारचा गुन्हा आहे. मी बोललो आहे की, कुठलीही महिला बाप होऊ शकत नाही. त्यासाठी पुरुषाचे शरीर आवश्यक असते. मला वाटते की माझे कुठलेही हातवारे नाही, आणि तसा माझा उद्देश नाही. मी सांगितले होते की त्या माझ्या ताई आहेत”, असं संजय गायकवाड म्हणाले.
“यामध्ये 100 टक्के राजकारण आहे आणि महाराष्ट्रात आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. ज्या महाराष्ट्रात 6 हजार पोरींचे संसार बसवले, ज्यांनी 250 ते 300 मुली लव जिहादमधून वाचवलं, ज्या पळून गेलेल्या 1 हजार, 2 हजार मुली वापस आणल्या, त्या माणसावर अशा प्रकारचं लाच्छंद लावले, ते हलकटपणाचे लक्षण आहे. त्यांच्या दिवाळखोर बुद्धीची मला कीव येते. ठिक आहे. तुम्ही पक्ष वाढवा. शेवटी आपण महायुतीमध्ये आहोत”, अशी भूमिका संजय गायकवाड म्हणाले.
“भविष्यात महायुती झाली तर फायदा आम्हाला होईल. इतक्या हलकट लेवलवर कोणी जाऊ शकत नाही. तसे आमदार लेवलच्या व्यक्तीला शोभत नाही. कोणत्या माणसावर, ज्याने तोंडभरून ताई म्हटले किंवा ज्यांनी इतक्या मुलींचे रक्षण केलं, त्याच्यावर हा आरोप करणे योग्य नाही”, असं संजय गायकवाड म्हणाले.
Crime News : मध्यरात्री लग्नाचा हट्ट अन् नकार मिळताच नको ते कृत्य, 30 वर्षीय तरुणीवर हल्ला; पोलिसांकडून गंभीर दखल
संजय गायकवाड यांचा मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा
संजय गायकवाड यांना पत्रकारांनी पुढे काय करणार? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “गरज पडल्यास मंत्रालयासमोर आंदोलन किंवा उपोषण करेन. आमच्या जिल्ह्यात हे चाललंय ते थांबलं पाहिजे. महाराष्ट्र सरकार बदनाम होत चालले. मुख्यमंत्रीदेखील बदनाम होत आहे आणि आपला पक्ष पण बदनाम होत चालला आहे”, असं गायकवाड म्हणाले.
Manoj Jarange Patil : मुंबई पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली, मनोज जरांगे यांना धक्का, आदेशात नेमकं काय म्हटलं?
संजय गायकवाड यांचा पोलिसांवर आरोप
“शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता आक्रमक झालेला आहे. जिल्ह्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत की, जो माणूस कधीही बाईबद्दल वाईट एकूण घेत नाही, अशा प्रकाराचा गुन्हा दाखल करणं, त्यामुळे भावना दुखावल्या आहेत. सर्व कार्यकर्ते पोलिसांना घेराव करण्याकरिता एकत्र आले होते. मी सांगितले की, तुमच्या किती चुका मागच्या काळात झाल्या. तुम्ही कशाप्रकारे एकतर्फी कारवाई करत आहेत हे त्यांच्या लक्षात आणून दिले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन येतो आणि खोटी कारवाई केली जाते. खऱ्या लोकांवर अन्याय होत आहे. पोलिसांनी पारदर्शी वागले पाहिजे”, अशी भूमिका संजय गायकवाड यांनी मांडली.
Nagpur News : मैकबेथने खऱ्या मित्राला संपवलं, हे शेक्सपियरचं नाटक नाही, वास्तव आहे, आनंदात एकत्र दारु प्यायले अन् जीव घेतला
‘गुन्ह्याविरोधात कोर्टात जाणार’
“आम्ही 482 मध्ये एफआयआर क्रॅश करणार, हा टेक्निकल गुन्हा आहे. कारण हा गुन्हा कोर्टात टिकू शकत नाही. हा काही डायरेक्ट विनयभंगपण नाही. त्यामुळे आम्ही कोर्टात जाणार”, असं संजय गायकवाड म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा