• Sat. Jun 6th, 2026
    Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो कृपया लक्ष द्या! मध्य, पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा वेळापत्रक

    Western And Central Railway Megablock : काही जलद गाड्यांना दिवा, मुंब्रा, कळवा स्थानकात अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

    मुंबई लोकल ट्रेन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : ठाणे आणि डोंबिवली स्थानकात १५ डबा लोकल चालवण्यासाठी फलाट विस्ताराचे काम सुरू आहे. विस्तारकामासाठी आज, शनिवारी रात्री १० तासांचा ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर १२ ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवलीदरम्यान हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. त्याचबरोबर सीएसएमटीहून कल्याण दिशेला जाणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्येही बदल होणार आहे.

    स्थानक – मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली
    मार्ग – अप आणि डाउन धीमा
    वेळ – शनिवारी मध्यरात्रीनंतर १२ ते रविवारी सकाळी १०
    परिणाम – ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. ठाकुर्ली आणि कोपर स्थानकात जलद मार्गाचे फलाट नसल्याने या स्थानकात लोकल थांबणार नाही.
    Maharashtra TimesGood News : ‘एसटी’ स्वच्छतागृहे आता मोफत, प्रवाशांच्या सुविधेसाठी महामंडळाचा निर्णय; कधीपासून अंमलबजावणी होणार?
    ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल ( शनिवारी )
    सीएसएमटीहून रात्री १०.२८ सीएसएमटी – खोपोली
    कल्याणहून रात्री ११.१५ कसारा-सीएसएमटी

    ब्लॉकपूर्वी पहिली लोकल (रविवारी)
    सीएसएमटीहून सकाळी ९.२६ सीएसएमटी-कल्याण
    कल्याणहून सकाळी १०.०९ टिटवाळा-परळ

    लोकल, एक्स्प्रेस विलंबाने
    ब्लॉक वेळेत काही लोकल कुर्ला, ठाणे, मुंब्रा येथून सुरू होणार असून येथून सुरू होणाऱ्या कल्याणपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी आणि दादरकडे अप आणि डाउन मेल-एक्स्प्रेस पाचव्या-सहाव्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. यामुळे रविवारी सकाळीदेखील लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत.
    Maharashtra TimesMaharashtra Heatwave : कडाक्याचं ऊन, उष्माघाताचा धोका वाढला, ‘दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडू नका’, गिरीश महाजन यांचं आवाहन
    पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक
    पश्चिम रेल्वेच्या पालघर आणि बोईसर स्थानकांदरम्यान रेल्वे उड्डाणपुलासाठी बॉक्ससंबंधी पायाभूत सुविधांचे काम करण्यासाठी, पालघर आणि उमरोळी स्थानकादरम्यान गर्डर उभारण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी रात्री ११.१५ ते रविवारी पहाटे ५.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे मेमू गाड्यांसह लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे. शनिवारी गाडी क्रमांक १९१०२ सुरत-विरार एक्स्प्रेस डहाणू स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे.
    स्थानक – पालघर ते उमरोळी
    मार्ग – अप आणि डाउन
    वेळ – शनिवारी रात्री ११.१५ ते रविवारी पहाटे ५.१०

    १८ एप्रिलला रद्द होणाऱ्या मेमू

    डहाणू रोड येथून रात्री १०.४५ ला सुटणारी डहाणू-विरार
    विरार येथून रात्री ९.०५ ला सुटणारी विरार-डहाणू रोड
    विरार येथून रात्री १०.५० ला सुटणारी विरार-डहाणू रोड

    विलंबाने धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस

    (१९०३७) वांद्रे टर्मिनस ते बरौनी अवध, (१९४२५) बोरिवली-नंदुरबार एक्स्प्रेस, (१२२६७) मुंबई सेंट्रल-हापा दुरांतो
    (२२९२३) वांद्रे टर्मिनस ते जामनगर

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा