• Tue. Jun 16th, 2026
    Chhatrapati Sambhajinagar Crime: बसस्थानकातील महिलांकडे पाहून विक्षिप्त हावभाव, चोरुन फोटो क्लिक केले; प्रवाशांनी विकृत आरोपीला चोपलं

    Chhatrapati Sambhajinagar Crime News : पैठण बसस्थानकावर महिलांचे चोरून फोटो काढणाऱ्या आणि अश्लील हावभाव करणाऱ्या शबीर शेख या विकृताला प्रवाशांनी रंगेहात पकडून बेदम चोप दिला. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

    आरोपीचा फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पैठण बसस्थानक परिसरात महिला आणि तरुणींचे गुपचूप फोटो काढून त्यांच्याकडे बघून अश्लील हावभाव करणाऱ्या एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला प्रवाशांनी रंगेहात पकडले. संतापलेल्या नागरिकांनी या ‘रोमिओ’ची जागीच चांगलीच धुलाई केली आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शबीर कादर शेख (वय ४२, रा. नांदर, ता. पैठण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

    नेमकी घटना काय?

    या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, पैठण बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. दुपारी एक ३६ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबली होती. यावेळी आरोपी शबीर शेख हा संशयास्पदरीत्या तिथे वावरत होता. त्याने आपला मोबाईल काढून तिथे उभ्या असलेल्या महिलांचे आणि महाविद्यालयीन तरुणींचे त्यांच्या नकळत चोरून फोटो काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार संबंधित फिर्यादी महिलेच्या लक्षात आला.केवळ फोटो काढूनच हा नराधम थांबला नाही, तर तो महिलांकडे बघून अत्यंत किळसवाणे आणि अश्लील हावभाव करत होता. त्याच्या या कृत्यामुळे बसस्थानकावर उपस्थित असलेल्या महिलांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला काही वेळ दुर्लक्ष केल्यानंतर, जेव्हा त्याचा त्रास असह्य झाला, तेव्हा पीडित महिलेने प्रचंड धाडस दाखवले. तिने तातडीने पुढे होऊन आरोपीला या प्रकाराचा जाब विचारला आणि मोठमोठ्याने ओरडून इतर प्रवाशांना मदतीसाठी बोलावले.

    Maharashtra TimesPune News : देशातील कोणत्याही भागात कार चालवा बिनदिक्कत, BH नंबरप्लेटला पुण्यात उदंड प्रतिसाद, रचना अत्यंत वेगळी

    प्रवाशांचा संताप आणि धुलाई

    महिलेचा आवाज ऐकून बसस्थानकावरील प्रवासी आणि स्थानिक तरुण मदतीला धावून आले. प्रवाशांनी तातडीने आरोपीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याची गॅलरी तपासली. मोबाईल तपासला असता, त्यात केवळ त्या महिलेचेच नव्हे, तर तिथे उपस्थित असलेल्या अनेक तरुणींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळले. हे पाहून उपस्थितांचा संताप अनावर झाला. जमावाने शबीर शेखला वेढा घातला आणि त्याची भररस्त्यात धुलाई सुरू केली.

    काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. या मारहाणीनंतर आरोपीला पैठण पोलीस ठाण्यात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी शबीर शेखविरुद्ध विनयभंग आणि सायबरच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा