Amravati Girls Assault Case : मानव सुगंधे आणि अयान यांची सुरुवातीला थेट ओळख नव्हती, परंतु पीयूष नावाच्या एका तरुणाच्या माध्यमातून अयान हा मानवच्या संपर्कात आला होता
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमरावती : अमरावती येथील परतवाडा लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेल प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान अहमद याने मित्रांमध्ये फुशारक्या मारण्यासाठी अधिकाधिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा जणू सपाटाच लावला होता. मुलींसोबत आक्षेपार्ह वर्तन करतानाचे व्हिडिओ काढायचा त्याला शौक लागला होता. मात्र पैशांवरुन मित्रात आपापसात वाद झाले आणि व्हिडिओ लीक झाले. अयानचा एक ‘लव्ह गुरु’ होता, जो त्याला मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याच्या वेगवेगळ्या टिप्स द्यायचा, असं तपासात समोर आलं आहे.
अयानला लव्ह गुरुच्या टिप्स
मुलींना पटवण्यासाठी ‘हाय-हॅलो’ असे जनरल मेसेज करायचे नाहीत. त्यांना असा एखादा प्रश्न विचार, ज्याचं उत्तर द्यायला त्यांना भाग पडेल, अशी एक ‘शिकवण’ या ‘लव्ह गुरु’ने अयानला दिली होती. उदाहरणार्थ, “आप वहीं हो ना, जो वहां मिले थे?” असे प्रश्न विचारुन अयान मुलींना आपल्यासोबत चॅटिंग करायला भाग पाडत असे. Pune Crime : पतीशी प्रेमसंबंधाचा संशय, पत्नीने पुण्यातील विवाहितेला हाल-हाल करुन मारलं, सहा तासात पोलिसांच्या जाळ्यात, दोन क्ल्यू निर्णायक
मित्राच्या फ्लॅटवर कारनामे
लैंगिक अत्याचारासाठी त्याने अमरावती शहरातील एका मित्राच्या फ्लॅटचा वापर केल्याचं तपासात समोर आलं आहे. वर्षभरात तो सात ते आठ वेळा मुलींना त्या ठिकाणी घेऊन गेल्याची माहिती आहे. या प्रकरणात अयानला फ्लॅट उपलब्ध करुन देणारा मित्र मानव सुगंधे यालादेखील पोलिसांनी अटक केली आहे.
अकबर सेक्युलर कसा? मोदी सरकारमुळे बदलाची सुरुवात; अशोक खरातचं नाव घेत शरद पोंक्षे काय म्हणाले?
मानवशी कॉमन फ्रेण्डद्वारे ओळख
मानव सुगंधे आणि अयान यांची सुरुवातीला थेट ओळख नव्हती. पीयूष नावाच्या एका तरुणाच्या माध्यमातून अयान हा मानवच्या संपर्कात आला होता. पीयूष आणि मानव पूर्वी त्याच फ्लॅटवर रुम पार्टनर म्हणून राहत होते. मात्र काही काळानंतर पीयूषने तो फ्लॅट सोडला. पीयूषची अयानसोबत जुनी ओळख असल्याने अयानने फ्लॅटबाबत विचारणा केली असता पीयूषने मानवशी संपर्क साधून दिला. प्रत्येक वेळी 500 रुपये देऊन तो फ्लॅटमधील खोलीचा वापर या कारनाम्यांसाठी करत होता.अयानने काही मुलींसोबत अमरावती शहरातील दोन कॅफे आणि परतवाडा येथील तीन कॅफेमध्येही आक्षेपार्ह वर्तन केल्याचं समोर आलं आहे. पोलिस आता या पाचही कॅफेंचा शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक केलेली आहे. Solapur Crime : नवऱ्याशी भांडून माहेरी, रीलस्टार सोनाली जाधवचा अनैतिक संबंधातून घात, वाढदिवसालाच प्रियकराने जीव घेतला
व्हिडिओ व्हायरल करणारी साखळी
अटक केलेल्या आठ आरोपींपैकी अयान मुख्य सूत्रधार आहे. मानव सुगंधे हा फ्लॅट उपलब्ध करुन देणारा, तर उर्वरित सहा आरोपी आक्षेपार्ह व्हिडिओ एकाकडून दुसऱ्याला व्हायरल करणारे आहेत. अयानकडून सर्वप्रथम त्याचा जिवलग मित्र उजेर खान याने व्हिडिओ मिळवले. ते पुढे मोहम्मद साद याला पाठवले. त्याने ते तरबेज खानला पाठवले. तर उजेरने ऐफाज खानलाही व्हिडिओ पाठवले. ऐफाजने मोहंमद इम्रानला पाठवले. त्याने पुढे शेख नावेदला पाठवले. ही साखळी अद्याप संपलेली नाही.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा