• Sun. Jun 14th, 2026
    AI व्हिडिओ बनवणारा भोंदू बाबा गजाआड, महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या

    Ahilyanagar Rajendra Gadge Arrest : सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणारा भोंदू बाबा राजेंद्र बापू गडगे याच्यासह पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राजेंद्र गडगे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    *

    मोबीन खान, संगमनेर, अहिल्यानगर : महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भोंदू बाबा अशोक खरात सध्या जेलमध्ये असून भोंदूगिरीचा खरात पॅटर्न राज्यभर चर्चेत आहे. अशातच अहिल्यानगर जिल्ह्यात देखील एका भोंदू बाबाचा अंनिसने पर्दाफाश केला आहे. ‘माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी मंत्रशक्तीने कॅन्सर बरा करतो आणि निपुत्रिकांना पुत्रप्राप्ती करून देतो,’ असा दावा करत सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणारा भोंदू बाबा राजेंद्र बापू गडगे याच्यासह पाच साथीदारांविरुद्ध रंजना गवांदे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर

    विशेष म्हणजे, या बाबाने आपल्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सरचिटणीस ॲड. रंजना गवांदे यांची चक्क ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओद्वारे बदनामी केल्याचाही खळबळजनक प्रकार समोर आला आहे. संगमनेर पोलिसांनी या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्याने अजूनही काही तक्रारदार समोर येण्याची शक्यता आहे.

    दत्तधाम सरकार चालवणारा भोंदू

    याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे ‘दत्तधाम सरकार’ नावाचा आश्रम चालवणारा भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यासोबत डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे आणि मधुकर शिंदे यांच्यावरही विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

    MLC Election : महाविकास आघाडीत एका जागेसाठी चुरस, इच्छुकांच्या रांगेत कुणाकुणाचा नंबर?

    अंनिसच्या राज्य सरचिटणीस ॲड. रंजना गवांदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. राजेंद्र गडगे हा स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचा भास निर्माण करून लोकांकडून ११ हजार ते ५१ हजार रुपयांपर्यंत रकमा उकळत होता. कॅन्सरसारखे गंभीर आजार मंत्रांनी बरे करण्याचा खोटा दावा तो करत असे. या लुबाडणुकीच्या अनेक तक्रारी ‘अंनिस’कडे प्राप्त झाल्या होत्या. जेव्हा ॲड. गवांदे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला, तेव्हा बाबाने सूडबुद्धीने त्यांचे आणि संघटनेचे नाव खराब करण्यासाठी कट रचल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesPune Crime : पतीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, पुण्यात दाम्पत्यासह 13 वर्षांची मुलगीही ताब्यात

    ‘एआय’ व्हिडिओ बनवून बदनामी

    भोंदू बाबाने आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत ॲड. गवांदे यांचे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार केले. ‘आम्ही बाबाकडे खंडणी मागत आहोत,’ असा बनावट आशय त्यात पेरला होता. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून ‘माझ्या विरुद्ध बोलाल तर खबरदार’ अशी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न बाबाने केला. मात्र, हे व्हिडिओ ‘एआय’ निर्मित असल्याचे गवांदे यांनी म्हटले आहे.फिर्यादीनुसार, १२ एप्रिल रोजी काही संशयितांनी ॲड. गवांदे यांना फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या घराबाहेर येऊन दबाव निर्माण केला. या प्रकारामुळे आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे ॲड. गवांदे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
    Maharashtra TimesNashik Crime : प्रत्येक सेकंदाला कॉल यायचा, TCS नाशिकमधील विवाहितेबाबत जाणीवपूर्वक सेटिंग, ‘सीक्रेट’साठी दबाव

    पाच जणांवर गुन्हा

    पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) सह खालील कडक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा, २०१३,औषधीद्रव्ये आणि जादूटोणा उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम, १९५४,महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९६१,माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) – बदनामी आणि बनावटगिरीसाठी अशा विविध कलमान्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस करत असून, भोंदूगिरीच्या या मोठ्या जाळ्याचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा