• Sun. Jun 14th, 2026
    Pune Crime : पतीशी प्रेमसंबंधाचा संशय, पत्नीने पुण्यातील विवाहितेला हाल-हाल करुन मारलं, सहा तासात पोलिसांच्या जाळ्यात, दोन क्ल्यू निर्णायक

    Pune Married Woman Poonam Moon Murder Case : पूनम दिनेश मून हिचे अॅड. संजय सावंत यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय सावंत याची पत्नी स्वाती सावंत हिला होता

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : शहरातील चंदननगर परिसरात अफेअरच्या संशयातून एका महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, हा खून थेट वकिलाच्या ऑफिसमध्ये घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या सहा तासांत आरोपींना अटक केली आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज हे दोन क्ल्यू या परिस्थितीत निर्णायक ठरले

    वकिलाच्या बायकोला संशय

    मिळालेल्या माहितीनुसार, पूनम दिनेश मून (वय ३९, रा. गणेशनगर, येरवडा) हिचे अॅड. संजय सावंत यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय सावंत याची पत्नी स्वाती सावंत हिला होता. या संशयातूनच स्वाती सावंत, तिची मुलगी आणि स्वतः अॅड. संजय सावंत यांनी संगनमत करून पूनम मून हिचा खून करण्याचा कट रचला.

    अनन्वित अत्याचार करुन जीव घेतला

    दिनांक १६ एप्रिल दुपारी २ वाजल्यापासून ते १७ एप्रिल सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत चंदननगरमधील जुना मुंढवा रोडवरील अॅड. सावंत यांच्या ऑफिसमध्ये ही घटना घडली. आरोपींनी आधी पूनम मून हिचे पाय दोरीने बांधले. त्यानंतर तिच्यावर निर्दयपणे हल्ला करत बॅटने तसेच धारदार शस्त्राने डोक्यावर आणि तोंडावर वार केले. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
    Maharashtra TimesSolapur Crime : नवऱ्याशी भांडून माहेरी, रीलस्टार सोनाली जाधवचा अनैतिक संबंधातून घात, वाढदिवसालाच प्रियकराने जीव घेतला
    या घटनेनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी अल्पावधीतच आरोपींचा माग काढला.

    अकबर सेक्युलर कसा? मोदी सरकारमुळे बदलाची सुरुवात; अशोक खरातचं नाव घेत शरद पोंक्षे काय म्हणाले?

    महिलेला अटक, बापलेक ताब्यात

    या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अॅड. संजय सावंत आणि त्यांच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मुख्य महिला आरोपी स्वाती सावंत हिला गुन्हे शाखेच्या खंडणी विभाग-२ पथकाने अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

    या गुन्ह्याचा तपास सहा पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
    Maharashtra TimesNashik Crime : प्रत्येक सेकंदाला कॉल यायचा, TCS नाशिकमधील विवाहितेबाबत जाणीवपूर्वक सेटिंग, ‘सीक्रेट’साठी दबाव
    दरम्यान, वैयक्तिक संशय आणि कौटुंबिक वादातून एवढ्या टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. कायद्याचा धाक न बाळगता थेट खून केल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा