• Sat. Jun 6th, 2026
    Sahar Shaikh : नगरसेवकपद धोक्यात, दिवसभर नॉट रिचेबल, पण सहर शेख थेट वानखेडेवर दिसली; ‘गेम ओव्हर’ स्टेटसने चर्चांना उधाण

    Sahar Shaikh Insta Story, Caste Certificate Case : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे कायदेशीर कचाट्यात सापडलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख नॉट रिचेबल असताना थेट वानखेडे स्टेडियमवर आयपीएल सामन्याचा आनंद लुटताना दिसल्या.

    नगरसेवकपद धोक्यात, दिवसभर नॉट रिचेबल, पण सहर शेख थेट वानखेडेवर दिसली; ‘गेम ओव्हर’ स्टेटसने चर्चांना उधाण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या मुंब्रा येथील एमआयएम नगरसेविका सहर शेख सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. प्रशासकीय कारवाईच्या भीतीने गेल्या २४ तासांपासून नॉट रिचेबल असलेल्या सहर शेख थेट मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल सामन्याचा आनंद लुटताना दिसल्या. त्यांनी स्वतः स्टेडियममधील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमधून विरोधकांना ‘गेम ओव्हर’ म्हणत डिवचले आहे. मूळच्या उत्तर प्रदेशच्या रहिवासी असताना बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर असून, त्यांचे नगरसेवकपद आता टांगणीला लागले आहे.

    इन्स्टाग्रामला लावली स्टोरी

    बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात कायदेशीर कचाट्यात सापडलेल्या ठाणे महानगरपालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल होत्या. मात्र, एकीकडे पोलीस आणि प्रशासन चौकशी करत असतानाच, सहर शेख थेट वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा आनंद लुटताना दिसल्या आहेत. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान त्या उपस्थित होत्या, ज्याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाच्या स्टोरीवरून शेअर केला आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    सहर शेख यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून महापालिका निवडणूक लढवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. तक्रारदार सिद्धीकी अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात याविरोधात दाद मागितली आहे. सहर यांचे वडील युनूस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत. महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून बनावट कागदपत्रांच्या आधारे इतर मागास प्रवर्ग हे प्रमाणपत्र मिळवल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. याच प्रमाणपत्राच्या जोरावर सहर शेख यांनी मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० मधून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

    Maharashtra TimesNagpur Crime : नागपूरमध्ये खाकीचा धाक संपलाय का? रात्रीच्या गस्तीदरम्यान थेट पीएसआयवर चाकूहल्ला करून पळवली त्यांचीच बुलेट

    ‘नॉट रिचेबल’ असताना स्टोरी ठेवल्याने चर्चेत

    मागील २४ तासांपासून सहर शेख कोणाशीही संपर्कात नव्हत्या. मात्र, १६ एप्रिलच्या रात्री मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर त्या सामना पाहताना दिसल्या. त्यांनी इन्स्टाग्रामवर स्टेडियममधील गॅलरीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी ‘गेम ओव्हर…’ असे कॅप्शन दिले असून बॅकग्राउंडला “तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ…” हे गाणे लावले आहे. त्यामुळे आता नेमकं आता त्या या स्वतः च्या नगरसेवकपदाबबद्दल बोलत आहेत का किंवा विरोधकांना काही इशारा देत आहेत, याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.

    तक्रारदाराचे आरोप

    सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. स्थलांतरितांसाठी आवश्यक असलेला ‘नमुना १०’ ऐवजी ‘नमुना ८’ वापरून यंत्रणांची दिशाभूल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा