Amravati Girls Assault Case : अमरावती शहरातील एक फ्लॅट हे अयानने केलेल्या अत्याचाराचं मुख्य केंद्र होतं. मात्र काही पीडितांना त्याने चिखलदरा येथील एका हिल स्टेशन रिसॉर्टवर नेलं, तसंच वेगवेगळ्या शहरांमधील कॅफेमध्येही नेल्याचं समोर आलं आहे
वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार
अमरावती (ग्रामीण) पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार की, अयान लैंगिक अत्याचार करुन त्या कृत्यांचं शूटिंग करण्यासाठी विविध ठिकाणी घेऊन जात असे. “अमरावती शहरातील एक फ्लॅट हे या गुन्ह्याचं मुख्य केंद्र होतं. पीडितांना चिखलदरा येथील एका हिल स्टेशन रिसॉर्टवर, तसेच वेगवेगळ्या शहरांमधील कॅफेमध्येही नेण्यात आलं होतं” असे आनंद यांनी सांगितले.
फोन-लॅपटॉप जप्त
आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असले, तरी घरांची झडती घेतली असता एक लॅपटॉप, एक हार्ड डिस्क आणि एक टॅब्लेट हस्तगत करण्यात आले. “सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत; तिथे त्यातील डेटा काढला जाईल. हे व्हिडिओ साधारण सहा महिन्यांपूर्वी चित्रित करण्यात आले होते” असे आनंद यांनी सांगितले.
Nashik Crime : आमची मुलं दोषी असतील, तर खुशाल फाशी द्या; पण धार्मिक द्वेष नको, नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या पालकांचा संताप
सर्व पीडिता मुस्लिम समाजाच्या
या प्रकरणाला कोणताही जातीय रंग असल्याचं नाकारत, आतापर्यंत ओळख पटलेल्या सर्व आठही पीडिता या मुस्लिम समाजाच्या असल्याच्या वृत्ताला विशाल आनंद यांनी दुजोरा दिला. मात्र त्या सर्वांचे किंवा त्यातील काहींचे वय अठरा वर्षांखालील (अल्पवयीन) आहे की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
“गुन्ह्याच्या वेळी त्यांचे वय किती होते, याची आम्हाला खात्री करणे आवश्यक आहे. महिला अधिकाऱ्यांमार्फत पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधूनही, पीडितांपैकी कोणीही किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही” असं आनंद म्हणाले.
वेगवेगळ्या बाबी हाताळण्यासाठी एसआयटी पथकातील सदस्यांची विभागणी करण्यात आली आहे. काही जण अधिक आरोपींचा शोध घेत आहेत, काही जण डिजिटल उपकरणांच्या तांत्रिक विश्लेषणावर लक्ष केंद्रित करत आहेत, तर इतर जण या शोषणामागे संघटित गुन्हेगारी होती का, याची पडताळणी करत आहेत.
MLC Election 2026 : विधानपरिषदेच्या एका जागेसाठी चढाओढ, महायुती महाविकास आघाडीची धाकधूक वाढणार?
सोशल मीडियावर १८० पीडिता असल्याचे दावे
सोशल मीडियावर पीडितांची संख्या जवळपास १८० ते २०० असल्याचे दावे केले जात होते; मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी या चर्चा उडवून लावत, आतापर्यंत केवळ आठ पीडितांची ओळख पटल्याचे स्पष्ट केले आहे. “पीडितांची संख्या दडपण्याचा किंवा आरोपींना मदत करण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये. म्हणूनच, पारदर्शकता राखली जावी यासाठी मी दररोज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहे” असे आनंद यांनी सांगितले.
सहा कर्मचाऱ्यांची बदली
तपासावर प्रभाव टाकण्याची शक्यता असल्याचा आरोप काही संघटनांनी केल्यानंतर, परतवाडा पोलीस ठाण्यातील सहा कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरु करण्यात आली आहे. संबंधित व्हिडिओ सर्वप्रथम व्हायरल झाले, तेव्हा हे पोलीस कर्मचारी आपलं म्हणणं ऐकून घेण्यास उत्सुक नव्हते, असे काही संलग्न संघटनांनी म्हटलं आहे.
Amravati Crime : पहिल्या ब्रेकअपमुळे प्लेबॉय बनलो; 180 मुलींचं शोषण करणाऱ्या अयानची निर्लज्ज कबुली, स्टोरी ऐकून पोलीस चक्रावले
या तपासाबाबत राज्यस्तरीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नियमितपणे माहिती दिली जात असल्याचे विशाल आनंद यांनी सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २९४; पोक्सो कलम ८ व १२; आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ व ६७(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
