मुंबई : विक्रोळी पश्चिम येथील राहुल नगरमध्ये घरगुती कारणांवरुन भावांमध्ये सुरु असलेल्या जुन्या वादाचे रुपांतर गुरुवारी पहाटे एका भीषण घटनेत झाले. मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्यावरुन झालेल्या भांडणाचे पर्यवसान प्राणघातक चाकू हल्ल्यात झाले. यात ४० वर्षीय पिता आणि १४ वर्षीय मुलगा यांचा मृत्यू झाला, तर आई, धाकटा मुलगा आणि एक शेजारी असे तिघे जण जखमी झाले आहेत. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी शेजाऱ्यांनी घराचा वीजपुरवठा खंडित करुन घरात अंधार केला. त्यानंतर आत प्रवेश करुन आरोपींना पकडले.
ही घटना विक्रोळी पश्चिमेकडील पार्कसाइट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा किशोरवयीन मुलगा श्लोक या दोघांनाही चाकू हल्ल्यात गंभीर जखमा झाल्या होत्या. राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले.
सुनील यांची पत्नी अंजू (३५) आणि धाकटा मुलगा विवान यांच्यावरही चाकूने अनेक वार झाले आहेत. त्यांच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महादेव मगर या शेजाऱ्याच्या उजव्या हातालाही चाकूची जखम झाली.
पोलिसांनी सुनीलचा भाऊ सूरज (३३) आणि सुरेंद्र (३६) तसेच सुरेंद्रची पत्नी प्रीती (३५) यांना हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
Pune Crime : शाळेपासून अफेअर, पुण्यात जाताच निकिता विसरली; संतप्त तरुणाने हिंजवडी गाठली, एक्सच्या प्रियकराला जीवानिशी संपवलं
तिघा भावांचा जुना वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही भाऊ राहुल नगरमधील एका लहान घरात (ज्यात पोटमाळा आहे) एकत्र राहत होते, तर त्यांचा सर्वात मोठा भाऊ अनिल नालासोपारा येथे राहतो.
मयत सुनील पूर्वी आरटीओ एजंट म्हणून काम करत होते, त्यांनी नंतर टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली होती, तर त्यांचे दोन भाऊ किरकोळ कामे करत होते. “वीज बिल भरण्यावरुन आणि इतर अनेक मुद्द्यांवरून या भावांमध्ये अनेकदा वाद होत असत” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या गुन्ह्यामागचे तात्कालिक कारण म्हणजे सुनीलच्या दोन मुलांपैकी एक जण मध्यरात्रीनंतर मोठ्या आवाजात गाणी लावून होता, ज्याला सूरजने आक्षेप घेतला. वादाचे रुपांतर हिंसक मारामारीत झाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कामावरुन नुकत्याच परतलेल्या सुनीलवर सुरेंद्र आणि सूरज यांनी हल्ला केला.
Pune Crime : मेडिटेशन सेंटरमधील महिलेवर एकतर्फी प्रेम, घटस्फोटित पुरुषाने जागा मालकाला संपवलं, पुण्यातील बाणेरमध्ये थरकापसुरेंद्रने सुनीलला पकडून ठेवले असताना, सूरजने स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि सुनीलच्या मानेवर व छातीवर वारंवार वार केले. “सुनीलची पत्नी आणि मुलगा त्याला वाचवण्यासाठी धावले, पण त्या भावांनी त्यांच्यावरही हल्ला करण्यास सुरुवात केली” असे एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले.
वडिलांना वाचवताना श्लोक मध्ये पडला
१४ वर्षीय श्लोकने आपल्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सूरजने त्याच्याही मानेवर चाकूने दोनदा वार केले. पती आणि श्लोक यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना अंजूवरही दोनदा वार करण्यात आले, तर विवानलाही दुखापत झाली.
जावेने दरवाजा लावला
गोंधळ ऐकून परिसरातील रहिवासी त्या घराकडे धावले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सुरेंद्रची पत्नी प्रीतीने बाहेरून दरवाजा लावून घेतला होता आणि ती पहारा देत उभी होती, त्यामुळे शेजाऱ्यांना हस्तक्षेप करता आला नाही.
महादेव मगर या शेजाऱ्याने अखेरीस बळजबरीने घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यास प्रीतीने त्याला अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. “झटापटीदरम्यान माझ्या उजव्या हातावर दोनदा चाकूने वार झाले आणि तो वार आरपार गेला,” असे मगर यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले.
Crime News : ग्लुकोज ड्रिपमधून पतीला विष, प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओने महिला गोत्यात, मृत्यूच्या तीन महिन्यांनी बॉडी बाहेर काढण्याची वेळजखमींना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी सुनील आणि श्लोक यांना मृत घोषित केले. अंजू, विवान आणि महादेव मगर यांच्यावर उपचार करण्यात आले; नंतर अंजू आणि विवान यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ सील केले आणि फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा