• Sun. Jun 14th, 2026
    Good News : ‘एसटी’ स्वच्छतागृहे आता मोफत, प्रवाशांच्या सुविधेसाठी महामंडळाचा निर्णय; कधीपासून अंमलबजावणी होणार?

    S.T Bus Stand Free Toilets : ‘प्रवाशांना १ जूनपासून एसटीतील सर्व स्वच्छतागृहांचा वापर मोफत करता येणार आहे. स्थानक-आगारात त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसह चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा दर्जाही उंचवण्यात येत आहे’, असं परिवहनमंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

    १ जून एसटी स्टँण्ड स्वच्छातागृहे मोफत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    महेश चेमटे, मुंबई : स्वच्छता अधिभार भरणाऱ्या प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाकडून आता दिलासा मिळणार आहे. राज्यातील एसटी स्थानकांतील सर्व स्वच्छतागृहांचा वापर प्रवाशांसाठी मोफत करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. स्थानक-आगारात दर चार तासांनी स्वच्छता, पाणपोईची स्वच्छता आणि देखभाल, चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमधील सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त, अर्थात १ जूनपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

    स्वच्छतेचा दर्जा दिवसेंदिवस घसरत आहे

    एसटी स्थानक-आगारांत स्वच्छतेचा दर्जा दिवसेंदिवस घसरत आहे. सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने प्रवासी वर्दळ वाढती आहे. त्यामुळे अस्वच्छतेत आणखी भर पडत आहे. एसटी स्थानक-आगारांसह स्वच्छतागृहे, चालक-वाहकांची विश्रांतीगृहे, पाणपोई यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रतितिकीट दोन रुपये स्वच्छता अधिभार १५ एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesNESCO Music Concert : अंमली पदार्थांसाठी व्हॉट्सॲप अन् स्नॅपचॅट, विनीतने कसे केले व्यवहार?; गोरेगाव म्युझिक कॉन्सर्टमधील धक्कादायक वास्तव

    पाच ते १० रुपये आकारले जातात

    सुलभ शौचालय, वाल्मिकी मेहतर समाज आणि एसटी महामंडळ अशा संस्थांकडून महामंडळाच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जाते. अनेक ठिकाणी याचा वापर करण्यासाठी पाच ते १० रुपये आकारले जातात. पैसे घेऊनही प्रवाशांकडून स्वच्छतेबाबत तक्रारी कायम आहेत. यामुळे ताब्यात असलेल्या स्वच्छतागृहांसह अन्य दोन्ही संस्थांकडील स्वच्छतागृहांचा वापर मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या दुर्लक्षित पाणपोई पुन्हा सुरू करण्यासह त्यांची देखरेख करण्यात येणार आहे. चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाचा दर्जा सुधारण्यासह गरम पाण्याचा पुरवठाही केला जाणार आहे.
    एसटीत ५६४हून अधिक स्वच्छतागृहे आहेत. त्यातील २६७ स्वच्छतागृहांचा ताबा महामंडळाकडे आहे. उर्वरित सर्वाधिक ‘सुलभ’कडे असून काही वाल्मिकी समाजाकडे आहेत. दोन्ही संस्थांना यापूर्वीच महामंडळाने नोटिसा बजावल्या आहेत. महामंडळाच्या निर्णयामुळे दोन्ही संस्थांकडून न्यायालयात जाण्याचे संकेत आहेत. यामुळे महामंडळाने संबंधित विभागांना ‘कॅव्हेट’ दाखल करण्याची तयारी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
    Maharashtra TimesAmravati Crime : अमरावतीतील परतवाडा आक्षेपार्ह व्हिडिओ फाइल्स प्रकरण; आरोपींची संख्या वाढली, फॉरवर्ड करणाऱ्यांचा शोध सुरु

    वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

    एसटीतून रोज ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलतधारी प्रवाशांना हा अधिभार लागू असणार नाही. स्वच्छता अधिभारातून रोज एक कोटी रुपये, असा मासिक ३० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. मोफत स्वच्छतागृहांसह एसटी गाड्यांची धुलाई, स्थानकात नवे कचरा डबे, दर चार तासांनी यांत्रिक पद्धतीने स्वच्छता यासाठी साधारण ३८ ते ४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे अधिभाराव्यतिरिक्त उर्वरित खर्च महामंडळ उचलणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

    एसटीतील स्वच्छतागृहे आणि संचलन करणाऱ्या संस्था

    एसटी महामंडळ – २६७

    सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन – १०७

    मेहकर वाल्मिकी समाज – ७७

    अन्य बाह्य संस्था – ११३

    एकूण – ५६४

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा