Mumbai Temperature: मार्च महिन्याच्या तुलनेमध्ये मे महिना मुंबईकांना थोडा दिलासा देणारा ठरू शकतो, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबईकरांना दिलासा मिळणार? मार्चच्या तुलनेत मे महिन्यात उष्णतेपासून दिलासा; IMD ने वर्तवला अंदाज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मार्चमध्ये मुंबईत चार वेळा उष्ण हवामानाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला होता. एप्रिलमध्येही अवघ्या काही दिवसांच्या अंतराने सलग दोनदा मुंबईकरांनी उष्म्याचा अनुभव घेतला. त्यामुळे मे महिन्यात काय होईल, याची भीती मुंबईकरांना असतानाच, मार्चच्या तुलनेत मे महिना थोडा दिलासा देणारा ठरू शकेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.
उष्णतेच्या लाटा, आरोग्य आणि हवामान वार्तांकन या विषयावर भारतीय हवामान विभाग, ‘असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्स’ आणि ‘मुंबई प्रेस क्लब’ यांच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख बिक्रम सिंह यांनी याबद्दल माहिती दिली.
किनारपट्टीच्या भागामध्ये आता समुद्रावरून येणाऱ्या हवेचा परिणाम दिसू लागेल, त्यामुळे कमाल तापमान फार चढणार नाही, असे सिंह यांनी सांगितले. काही दिवस सरासरीपेक्षा थोडे जास्त कमाल तापमान नोंदले गेले, तरी मार्चप्रमाणे त्रासदायक परिस्थिती निर्माण होणार नाही, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्राच्या अंतर्भागात मात्र उन्हामुळे त्रासदायक मे महिन्याचीही शक्यता आहे. जूनपर्यंत अशी त्रासदायक उष्णतेची स्थिती अधूनमधून नागरिकांना जाणवू शकते. उन्हाळ्यासाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या अंतर्भागात सरासरीहून अधिक कमाल तापमानाची शक्यता आहे.
मुंबईमध्ये गेल्या २७ वर्षांमध्ये सरासरी तापमान दोन अंशांनी वाढले आहे. शहरामध्ये ६६ टक्के बांधकामे वाढली आहेत. शहराचे सरासरी तापमान १९९१ मध्ये ३६.२८ अंश सेल्सिअस होते. ते २०१८मध्ये ३८.२८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. याची माहिती महाराष्ट्र आरोग्य सेवा, साथरोग विभागाचे निवृत्त राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. मुंबईतील ८१ टक्के खुल्या जागा नष्ट झाल्या आहेत. ४० टक्के हरित क्षेत्र नष्ट झाले आहे. याचा परिणाम स्वाभाविक मुंबईच्या तापमानावर होत आहे. उष्णतेच्या लाटा हे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा महत्त्वपूर्ण, मात्र तुलनेने अदृश्य घटक आहे. २०११मध्ये उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांच्या राज्यात २८ घटना नोंदल्या गेल्या होत्या, असे आवटे यांनी सांगितले. यात चार घटनांमध्ये मृत्यू झाला होता. हाच आकडा २०२२मध्ये ७७३ घटना आणि ३१ मृत्यूंपर्यंत पोहोचल्याचेही ते म्हणाले. या वाढत्या परिणामांकडे अधिक जागरूकपणे पाहण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा