Nashik MD Drug Case: नशेचे इगतपुरी कनेक्शन समोर आले असून, सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दीड ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे.
नाशिक ड्रग्ज कनेक्शन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: पंचवटी परिसरातील नीलगिरीबाग येथे नाशिक शहर अमली पदार्थविरोधी पथकाने (एनडीपीएस) रात्री सापळा रचून केलेल्या कारवाईत सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून दीड ग्रॅम एमडी (मॅफेड्रॉन) जप्त करण्यात आले. ऋषिकेश गणेश परसे उर्फ ऋषीबाबा (वय २३, रा. पेठरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याने इगतपुरी येथून हा पदार्थ आणल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा नशेचे इगतपुरी कनेक्शन समोर आले आहे.
संशयित ऋषीबाबा एमडी विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांना मिळाली होती. त्यांनी ‘एनडीपीएस’चे अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना सूचित केले. त्यानुसार ‘एनडीपीएस’चे सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी यांच्यासह पथक सापळा रचण्याची तयारी करून घटनास्थळी पोहोचले तेव्हा पंचवटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार यांचेही पथक दाखल झाले.
Trimbakeshwar Darshan Scam: त्र्यंबकेश्वर VIP दर्शनासाठी भाविकांची लूट; विश्वस्ताचं ‘कमिशन’ 80 टक्के, महिन्याची कमाई लाखांत ‘एनडीपीएस’चे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार भारत डंबाळे, अर्चना भड, संतोष सौंदाणे, गणेश वडजे, चंद्रकांत बागडे यांनी परिसरात शोध घेत एका पत्र्याच्या खोलीतून संशयित ऋषीला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत दीड ग्रॅम एमडी, दीड लाखाचा महागडा मोबाइल, वीस हजारांचा दुसरा मोबाइल आणि २६ हजारांची रोकड असा दोन लाख साडेतीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Ashok Kharat Case: केसरकरांच्या आग्रहामुळेच एकनाथ शिंदे खरातकडे; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खुलासा फॉरेन्सिक पथकाच्या साक्षी कुऱ्हाडे आणि एस. डी. गिरासे यांनी पुरावे संकलित केले. पंचवटी पोलिसांनी संशयिताची ओळख पटवल्यावर तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वी हद्दपार होता हे स्पष्ट झाले. दरम्यान, ऋषी हा हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरत होता. त्याने इगतपुरी येथील शाहरुख नावाच्या व्यक्तीकडून ‘एमडी’ आणल्याची कबुली दिली.
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा