Maharashtra Heat Stroke: महाराष्ट्रात एक मार्च ते १५ एप्रिलदरम्यान उष्माघाताच्या १७ रुग्णांची नोंद झाली आहे. कोणत्या जिल्ह्यात धोका अधिक? कशी घ्यावी काळजी?
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक चार रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले असून, जालना आणि पालघर येथे प्रत्येकी दोन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात आढळलेल्या तीन रुग्णांपैकी दोन रुग्ण बुधवारी आढळले. गडचिरोली, गोंदिया, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
Pune Heatwave : पुण्यात यंदा विक्रमी तापमान! उष्णतेची लाट तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर
एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वाढत असून, अनेक ठिकाणी तो ४० अंशांपुढे गेला आहे. दुपारी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. विशेषतः उन्हात दीर्घ काळ काम करणारे मजूर, बांधकाम क्षेत्रातील कामगार, शेतकरी; तसेच रस्त्यावर काम करणाऱ्या व्यक्तींना उष्माघाताचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
सर्व जिल्ह्यांमध्ये औषधे आणि आवश्यक उपायोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या काळात उष्माघात प्रतिबंध व उपचाराकरिता जिल्हा आणि महापालिका स्तरावर ‘कोल्ड रूम’ सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.
Pune Crime : ’50 लाख दिल्याशिवाय सुटका नाही’; कॅफेत गप्पा, प्लॅन्ट दाखवायला नेलं अन् पुढे थेट किडनॅप; देणी वसूल करण्यासाठी मेट्रो कंत्राटदारासोबत खळबळजनक प्रकार
या लक्षणांकडे द्या लक्ष
स्नायूंमध्ये वेदना होणे, अशक्तपणा जाणवणे, तीव्र डोकेदुखी, सतत उलट्या, श्वास घेण्यास त्रास होणे, लघवी कमी होणे, जास्त घाम येणे यांसारख्या लक्षणांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय करावे?
-पुरेसे पाणी प्यावे, संतुलित आहार घ्यावा.
-कैरी पन्हे, कोकम, लिंबू सरबत, डाळिंब रस, नारळ पाणी प्यावे.
-पांढरे किंवा फिकट रंगाचे, सुती व सैल कपडे वापरावे.
-उन्हात बाहेर फिरणे टाळावे, उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिणे टाळावे.
-थंड वातावरणातून उन्हात जाऊ नये.
