• Thu. Jun 18th, 2026
    अमरावतीत 180 मुलींचे 350 आक्षेपार्ह व्हिडिओ, 19 वर्षांच्या अयानने मोबाईल डेटा डिलीट केला; क्लीप फॉरवर्ड करणारेही रडारवर

    Amravati Girls Assault Case : अटक टाळण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मोबाइलमधील माहिती डिलीट केली, मात्र सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हा डेटा पुन्हा मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, अमरावती : अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांसह संपूर्ण अमरावती जिल्हा हादरवून सोडणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडीओ आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित अयान अहमद याच्या अचलपूर येथील घरातील बेकायदा बांधकामावर बुधवारी नगरपरिषदेने हातोडा मारला. चोख पोलिस बंदोबस्तात ही बुलडोझर कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात घेता ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.

    आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई

    अचलपूर नगरपरिषदेचे पथक बुधवारी दुपारी जेसीबी आणि बुलडोझर घेऊन लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमद याच्या घरासमोर दाखल झाले. घराचे सर्वेक्षण केल्यानंतर काही भाग अतिक्रमित असल्याचे समोर आले. त्यासंदर्भात प्रशासनाने आधीच नोटीस बजावली होती. कारवाईदरम्यान घराच्या बाजूला असलेला लोखंडी जिना आणि अतिक्रमित बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी स्थानिक नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार यांच्या नेतृत्वातील या पथकात १० अधिकारी आणि ३६ पोलिस अंमलदारांचा समावेश आहे. या पथकाला केवळ याच गुन्ह्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, तपासात पारदर्शकता आणि वेग राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
    Maharashtra TimesFight over Kittens : तुमच्या बोक्यामुळे आमची माऊ गरोदर, सांभाळा आता चार पिल्लं; मालकिणीने मांजरं भिरकावली, शेजाऱ्यांमध्ये वाद पेटला

    ‘डिलीट डेटा’ मिळवण्याचे प्रयत्न

    आरोपीच्या मोबाइलमधून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह डेटा जप्त करण्यात आला आहे. अटक टाळण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मोबाइलमधील माहिती डिलीट केली होती. मात्र, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हा डेटा पुन्हा मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोशल मीडियावरून संबंधित व्हिडीओ हटवण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग सक्रीय झाला असून, हे व्हिडीओ फॉरवर्ड करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामागे एखादे मोठे संघटित रॅकेट सक्रीय असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. चिखलदरा परिसरातील काही हॉटेलचे सीसीटीव्ही फूटेज या तपासात महत्त्वाचे दुवे ठरू शकतात, त्या दिशेनेही आता एसआयटीने तपास सुरू केला आहे.

    Sushma Andhare | खरातला अटक होऊन एक महिना पूर्ण, सुनेत्रा पवारांनी आजपर्यंत काय भूमिका घेतली?

    अचलपूर-परतवाडा बंद

    घटनेच्या निषेधार्थ बुधवारी भाजपने पुकारलेल्या अचलपूर-परतवाडा बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, प्रशासनाने आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला. घराचे अनधिकृत बांधकाम पाडत असतानाच, उर्वरित बांधकामाची कागदपत्रे ३० दिवसांत सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली. कागदपत्रे न दिल्यास घराचा वरचा मजलाही जमीनदोस्त करण्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
    Maharashtra TimesCrime News : अब्जाधीशाच्या बायकोला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी, जिम ट्रेनरला अटक

    व्हिडीओ व छायाचित्रे व्हायरल

    या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. मुख्य आरोपी अयान अहमद याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांनाही जेरबंद केले आहे. आरोपींनी आठ अल्पवयीन मुली आणि महिलांचे १८ व्हिडीओ व ३९ छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा