Goregaon NESCO Music Concert : नियम कडक करण्याबरोबरच त्याचे नीट पालन होते का, याची शहानिशा करण्यासाठी डान्सबारप्रमाणे अचानक भेटी देणे शक्य आहे का, याबाबत पोलिसांकडून विचार केला जात आहे.
नियमांचे सर्रास उल्लंघन
नेस्को सेंटरमध्ये आयोजित संगीत रजनीमध्ये दोघांचा अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने मृत्यू झाल्याने एकूण कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अटी आणि शर्तींवर परवानगी देऊनही संगीत रजनी कार्यक्रमामध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे या घटनेतून दिसून आले. त्यातच यातील तरुणांनी या आधी झालेल्या संगीत रजनी कार्यक्रमांत अंमली पदार्थ सेवन केल्याची कबुली दिली. यामुळे पोलिस यंत्रणेने हे रोखण्यासाठी पावले उचलली आहेत.
नियम अधिक कडक होणार
संगीत रजनी कार्यक्रमांसाठी इतर सार्वजनिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे नियमावली आहे. त्या नियमावलीनुसार पोलिस, अग्निशमन दल, वाहतूक पोलिस, उत्पादन शुल्क विभाग (दारू असल्यास) आणि पालिकेची परवानगी घेतली जाते. मात्र इतर कार्यक्रमांप्रमाणे असलेले नियम अधिक कडक करण्याच्या अनुषंगाने विचार सुरू आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
Crime News : अब्जाधीशाच्या बायकोला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी, जिम ट्रेनरला अटक
डान्सबारप्रमाणे छाप्यांचा विचार
नेस्कोमध्ये सर्वच नियम पायदळी तुडविण्यात आले. मात्र दोन मृत्यूंनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीतून हे समोर आले. संगीत रजनी सुरू असतानाच पोलिसांनी तपासणी का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नियम कडक करण्याबरोबरच त्याचे नीट पालन होते का, याची शहानिशा करण्यासाठी डान्सबारप्रमाणे अचानक भेटी देणे शक्य आहे का, याबाबत विचार केला जात आहे.
दोघा विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर कारवाई
नेस्को आणि ‘इन्स्पायरिंग टाय प्रोडक्शन’ यांच्या वतीने ११ एप्रिल रोजी ‘९९९९९९९९९- टेक्नो इव्हेन्ट’ या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्याने एमबीएच्या तीन विद्यार्थ्यांची तब्येत खालावली. उपचारादरम्यान बिस्मातसिंह भसीन आणि श्रेया राय या दोघांचा मृत्यू झाला, तर एका तरुणीवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये गोरेगाव नेस्को सेंटरबरोबर बीकेसी, वरळी डोम, महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी या संगीत रजनी आयोजित केल्या जातात. या सर्वच ठिकाणच्या संगीत कार्यक्रमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Girish Mahajan यांनी मद्यपी तरुणाला घडवली अद्दल, नेमकं काय घडलं पाहा
सुरक्षेबाबतही निर्णय घेणार
ड्रग्जसारख्या पदार्थांचे सेवन केले जाऊ शकते, हे माहीत असतानाही सुरक्षारक्षकांनी सुरक्षेत ढिलाई दाखवली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांना देण्यात येणाऱ्या खासगी सुरक्षेबाबतही ठोस निर्णय घेतला जात आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
आरोपी आज न्यायालयात
ड्रग्जमुळे दोन मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत सहा आरोपींना अटक केली. विहान उर्फ आकाश समळ, सनी जैन, रौनक खंडेलवाल, बालकृष्णन कुरूप, प्रतीक पांडे आणि आनंद पटेल अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना दिलेली पोलिस कोठडीची मुदत आज, गुरुवारी संपणार असल्याने त्यांना या दिवशी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Fight over Kittens : तुमच्या बोक्यामुळे आमची माऊ गरोदर, सांभाळा आता चार पिल्लं; मालकिणीने मांजरं भिरकावली, शेजाऱ्यांमध्ये वाद पेटला
साकीनाक्यातून २०० ड्रग्ज गोळ्या जप्त
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पार्टी ड्रग्जच्या संघटित साखळीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी पहाटे साकीनाका येथे छापा टाकून २०० एक्स्टेंसी गोळ्या जप्त केल्या. ही कारवाई घाटकोपर पथकाने केली. या कारवाईत एका तरुणास अटक करण्यात आली. जप्त गोळ्यांची किंमत २६ लाख रुपये इतकी आहे.
